Saturday, December 28, 2019

स्वराज्याचे शिलेदार -- सरनोबत प्रतापराव गुजर

 स्वराज्याचे शिलेदार -- सरनोबत प्रतापराव गुजर 

        स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शिलेदार लढून धारातीर्थी पडले. बहलोल खानाच्या ३० हजार फौजेपुढे हे मराठे वीर त्वेषाने लढले. त्यांना उद्देशूनच कवी कुसुमाग्रजांनी "वेडात मराठे वीर दौडले सात" हे गीत रचले. लता मंगेशकर यांनी आपल्या सुंदर आवाजात हे गीत गायले. हे गीत ऐकले कि आपलेही बाहू फुरफुरतात. मुठी आवळल्या जातात. सात वीर ३० हजार फौजेसमोर कसे लढले असतील याचा विचार न केलेलाच बरा. या सात वीरांना मृत्यूचे भय अजिबात वाटले नाही. त्यांना फक्त डोळ्यासमोर स्वराज्य दिसत होते. या स्वराज्यासाठीच ते त्वेषाने लढले. 

          प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात घनघोर युध्द झाले. प्रतापरावाने खानाचा पुरता बिमोड केला. खान प्रतापरावाला शरण आला. खानाने तहात 'मला सोडून दयावे, मी मुलखात परत जाईन.' असे म्हणले. युद्धात शरण आलेल्याना मारू नये असे युद्धशास्त्रात सांगितल्याने प्रतापरावाने दया दाखवून खानाला सोडून दिले. बहलोलखान परत येत असल्याची बातमी महाराजांना कळली. महाराज खवळले आणि त्यांनी प्रतापराव गुजरांना खरमरीत पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, 'बहलोलखान सारखा स्वारी करून येत आहे. त्याला संपवल्याखेरीज आम्हाला तोंड न दाखवणे.' हे पत्र हाती पडताच प्रतापराव गुजर बेभान झाला. त्यांनी तलवार हाती घेतली. त्यांच्याबरोबर विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिळदेव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर हे सहा मावळे घेतले. बहलोलखानाचा सूड घेण्यासाठी हे सात मावळे देहभान विसरून बेफाम सुटले होते. वाटेत त्यांना कुणीही अडवू शकत नव्हते इतके ते सुडाने पेटले होते. प्रतापरावाची आणि खानाची नेसरीच्या खिंडीत गाठ पडली. बहलोलखानाच्या फौजेपुढे सात जणांचा कितीसा निभाव लागणार ? बहलोलखानाच्या फौजेवर सात वीर तुटून पडले. शर्थीने लढत होते पण खानाची फौजच इतकी होती कि सात वीरांचे प्रयत्न कमी पडत होते. एक एक मोहरा गळत होता. शेवटी प्रतापराव सुद्धा धारातिर्थी पडला. स्वराज्याचा आणखी एक मोहरा गळाला. नेसरीची खिंड रक्ताने पावन झाली. तो दिवस होता शिवरात्रीचा. प्रतापराव परत तोंड दाखवण्यास येणार नव्हता. 

 

Friday, December 27, 2019

अवीट गोडीचे गाणे -- पंख होते तो उड आती रे


 अवीट गोडीचे गाणे -- पंख होते तो उड आती रे 

          "पंख होते तो उड आता रे" हे गीत सेहरा चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६३ साली प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता व्ही. शांताराम होते. या चित्रपटात मुख्य भूमिका संध्या, मुमताज, प्रशांत, ललिता पवार, मनमोहन क्रिशन यांच्या होत्या. जितेंद्र व मुमताज हे छोटया भुमिकेत दिसले. या चित्रपटातील गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली असून गीताला संगीत रामलाल यांनी दिले. या चित्रपटातील गाणी लता मंगेशकर, मोहमद रफी, आशा भोसले, हेमंत कुमार यांनी गायली आहेत. 
          "पंख होते तो उड आता रे" हे गीत लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. हे गीत संध्या व मुमताज यांचेवर चित्रित झाले आहे. या गाण्यात सांध्याचा नृत्यअविष्कार बघण्यासारखा आहे. तसेच तिने केलेला मुद्राभिनय उत्तम केला आहे. हे गाणे बघायला आणि ऐकायला सुंदर वाटते. 

पंख होते तो उड़ आती रे, रसिया ओ ज़ालिमा
तुझे दिल का दाग़ दिखलाती रे
पंख होते तो उड़ आती रे, रसिया ओ ज़ालिमा
तुझे दिल का दाग़ दिखलाती रे
यादों में खोयी पहुँची गगन में
पंछी बन के सच्ची लगन में
यादों में खोयी पहुँची गगन में
पंछी बन के सच्ची लगन में
दूर से देखा मौसम हसीं था
दूर से देखा मौसम हसीं था
आनेवाले तू ही नहीं था, रसिया ओ ज़ालिमा
तुझे दिल का दाग़ दिखलाती रे
पंख होते तो उड़ आती रे, रसिया ओ ज़ालिमा
तुझे दिल का दाग़ दिखलाती रे
किरनें बन के बाहें फैलायी
आस के बादल पे जाके लहरायी
किरनें बन के बाहें फैलायी
आस के बादल पे जाके लहरायी
झूल चुकी मैं वादे का झूला
झूल चुकी मैं वादे का झूला
तू तो अपना वादा ही भूला
रसिया ओ ज़ालिमा
तुझे दिल का दाग दिखलाती रे
पंख होते तो उड़ आती रे, रसिया ओ ज़ालिमा
तुझे दिल का दाग़ दिखलाती रे
पंख होते तो उड़ आती रे, रसिया ओ ज़ालिमा
तुझे दिल का दाग़ दिखलाती रे
पंख होते तो उड़ आती रे

Saturday, December 21, 2019

अभिनयाचा महामेरू - 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू




अभिनयाचा महामेरू - 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू 

          डॉ. श्रीराम लागूंनी आपल्या अभिनयाने काही भूमिका अजरामर करून ठेवल्या. प्रेक्षक या भूमिका कदापि विसरणार नाही. या भूमिकांमुळेच डॉ. श्रीराम लागूंचे नाव नाटयसृष्टीत व हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर राहील. असा कसदार अभिनेता परत होणे नाही. 
नाटयसृष्टी व डॉ. श्रीराम लागू 
          वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच लागूंनी नाटकांमध्ये काम करायला सुरवात केली. पुरोगामी नाटय संस्था- पुणे आणि रंगायतन - मुंबई या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमी व्यापून टाकली. वसंत कानेटकर लिखित 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकाच्या माध्यमातून १९६९ साली त्यांनी पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करायला सुरवात केली. त्यांनी 'एकच प्याला', 'किरवंत', 'गिधाडे', 'नटसम्राट', 'सूर्य पाहिलेला माणूस' अशी दर्जेदार नाटके केली. कुसुमाग्रज लिखित 'नटसम्राट' या नाटकात त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने साकारलेली गणपत उर्फ आप्पा बेलवलकर यांची भूमिका अजरामर केली. ते त्या भूमिकेत इतके समरस झाले होते कि आप्पासाहेब म्हणजेच डॉ. श्रीराम लागू असे समीकरण झाले होते. 
चित्रपटसृष्टी व डॉ. श्रीराम लागू 
          डॉ लागूंनी नाटकांबरोबरच हिंदी-मराठी चित्रपटातही भूमिका केल्या. त्यांच्या 'सिंहासन', 'पिंजरा', 'सामना', 'मुक्ता', 'जानकी','भिंगरी' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. पिंजरातील साधाभोळा मास्तर बाईच्या नादाला लागून कसा तिच्या जाळ्यात अडकतो हि भूमिका डॉ. लागूंनी उत्तमरीत्या साकारली आहे. सामनातील त्यांची व निळू फुलेंची अभिनयातील जुगलबंदी तर उत्तमच. दोन अभिनयात कसलेले कलाकार सामना चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळाले. त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा मराठी चित्रपटाबरोबर हिंदी चित्रपटातही उमटवला. 'लावारीस', 'मुकद्दर का सिकंदर', 'हेराफेरी' या गाजलेल्या चित्रपटात देखील आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पडली. 
सन्मान आणि पुरस्कार 
           डॉ. लागूंनी नाटक व सिनेमांमध्ये आपल्या कसदार अभिनयाची छाप पडली. त्यांनी केलेल्या अभिनयामुळे त्यांना पुढील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन १९७८ साली फिल्मफेअर पुरस्कार, १९९७ साली कालिदास सन्मान, २००६ साली दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार, २०१० साली संगीत नाटक अकादमी फेलोशिप, २०१२ साली राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या अभिनयाचा गौरवच आहे. 
          'नटसम्राट' व अभिनयाचा महामेरू डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे रंगभूमी व हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी पोरकी झाली.






















































Saturday, December 14, 2019

अवीट गोडीचे गाणे -- स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला

 

अवीट गोडीचे गाणे -- स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला 
          अरुण दाते यांनी बरीच भावगीते गायली आहेत. 'शुक्रतारा मंद वारा, या जन्मावर या जगण्यावर, भातुकलीच्या खेळामधली, दिवस तुझे हे फुलायचे, डोळे कशासाठी, दिल्या घेतल्या वचनांची, जपून चाल पोरी, धुके दाटलेले उदास उदास, दिस नकळत जाई, जेव्हा तिची नि माझी, स्वर गंगेच्या काठावरती, येशील येशील राणी पहाटे येशील' हि त्यांची भावगीते गाजलेली आहेत. हि भावगीते अजूनही कानाला गोड वाटतात. गुणगुणावीशी वाटतात. 
          'स्वरगंगेच्या काठावरती' हे अरूण दाते यांनी गायलेले अवीट गोडीचे भावगीत आहे. हे गीत शंकर वैद्य यांनी लिहिले असून या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले आहे.


स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला ? ।। धृ ।।


वदलीस तू, मी सावित्री ती 
शकुंतला मी, मी दमयंती 
नाव भिन्न परि मी ती प्रिती 
चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला 
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला ? ।। १ ।।

अफाट जगती जीव रजःकण 
दुवे निखळता कोठून मीलन 
जीव भुकेला हा तुजवाचून 
जन्मांमधुनी पिसाट फिरता, भेट घडे आजला 
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला ? ।। २ ।।





















स्वराज्याचे शिलेदार -- तानाजी मालुसरे


स्वराज्याचे शिलेदार -- तानाजी मालुसरे 

          तानाजी मालुसरा, उमरठ्याचा निधडया छातीचा वीर. महाराजांचा लाडका दोस्त. तानाजीने आपल्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न ठरवले. त्याचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी शिवाजी महाराजांकडे आला. त्याने शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्यातील कोंढाणा किल्ल्याबाबत चर्चा ऐकली. त्याने शिवाजी महाराजांना सांगितले कि कोंढाणा किल्ला मी घेणार. या कामगिरीवर मी जाणार. शिवाजी महाराज त्याला म्हणाले, "अरे तुझ्या मुलाचे लग्न आहे ते महत्वाचे. या कामगिरीवर दुसऱ्या कुणाला तरी पाठवता येईल." तानाजी महाराजांना म्हणाला, "आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे. हि कामगिरी फत्ते करून येईन मगच रायबाचे लगीन लावीन." असे म्हणून कोंढाणा किल्ला घ्यायचा विडा त्याने उचलला. महाराजांच्या पायावर त्याने शब्द वाहिला. त्याच्या मदतीला त्याचा भाऊ सुर्याजी उभा राहिला. 
          तानाजी बरोबर पाचशे मावळ्यांची फौज निघाली. गडाचा आकार कुऱ्हाडीसारखा होता. गडाला दोन दरवाजे होते, एक पुणे दरवाजा व दुसरा कल्याण दरवाजा. गडाला उभे सरळ कडे होते. तटबंदी पक्की होती. आत जायलाही जागा नव्हती. वद्य नवमीच्या काळ्या कुट्ट अंधारात तानाजी व सूर्याजी कडा चढून गडावर आले. शिपायांना संशय आला. त्यांनी आरडाओरडा केला. त्यासरशी मावळे 'हर हर, हर हर महादेव' म्हणून शत्रूवर तुटून पडले. तानाजी व उदयभान यांच्यात घनघोर लढाई चालू होती. दोघेही त्वेषाने लढत होते, एकमेकांवर तुटून पडले होते. तलवारीचे घावावर घाव पडत होते. आणि.....घात झाला ! उदयभानाच्या तलवारीच्या एका घावेने तानाजीच्या ढालीचे दोन तुकडे झाले. त्याही परिस्थितीत तानाजी हातावर वार झेलत लढत होता. दोघांनीही एकमेकांवर वज्रघाती घाव घातले. दोघेही धारातीर्थी पडले. तानाजी पडल्याची हाक उठली. त्यामुळे सर्व मावळे सैरावैरा पळू लागले. सुर्याजीला तानाजी पडल्याचे कळले तसा तो चवताळून म्हणाला, "अरे इथे तुमचा बाप मरून पडला आणि तुम्ही भ्याडासारखे पाळता कुठे ? चला माघारी फिरा." हे शब्द कानी पडताच मावळे त्वेषाने लढू लागले आणि किल्ला ताब्यात घेतला. महाराजांना जेव्हा हि बातमी कळली तेव्हा गड आला त्याचा आनंद झाला पण त्यांचा जीवाभावाचा दोस्त गेला त्याचे दुःख झाले. शिवाजी महाराजांना गड मिळाला पण निधडया छातीचा सिंह गमावला. म्हणून शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सिंहगड ठेवले. 
 
























 

























 

Friday, December 13, 2019

स्वराज्याचे शिलेदार -- जीजाबाई




स्वराज्याचे शिलेदार -- जीजाबाई 

          शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला शह देऊन स्वराज्य स्थापन केले. कधी गनिमी काव्याने तर कधी समोरासमोर लढाया करून मुघलांना पुरते नामोहरण केले. शिवाजी महाराजांकडे सैन्य फारच कमी होते, पण जे होते ते निधडया छातीचे होते. एकेकाच्या अंगात दहा हत्तीचे बळ होते. एक - एक मावळा हजाराला भारी होता. त्यांना सह्याद्रीवर दऱ्या - खोऱ्यांची, कडा - कपारींची संपूर्ण माहिती होती. शिवाजी महाराजांना याच शिलेदारांच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता आले. 
          शाहजहाँ दिल्लीचा बादशहा झाला. महमद आदिलशाह विजापूरचा बादशहा झाला तर निजामशाहीत फत्तेखान वजीर झाला. तिघेही अत्यंत क्रूर व कपटी होते. शहाजहानने दख्खनवर लढाया सुरु केल्या.तिघेही अंधाधुंद व जुलूमपणे राज्य करत होते. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या जात होत्या. मंदिरातील मूर्तींची विटंबना चालू होती. त्यांची तोडफोड चालू होती. आदिलशहाने धन, धान्य, गुरेढोरे, बायका, पोरं लुटली. काही बायका, पोरांना आपल्या स्वार्थासाठी बाटविले. त्यांच्यावर जबरदस्ती केली. मुघलांनी असा महाराष्ट्रात असा धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्र मनातल्या मनात रडत होता. तो वाट पाहत होता यातून आपल्याला कोण सोडवेल का ? आणि एक चमत्कार झाला. महाराष्ट्राचा हा शोक, आक्रोश बघून एक बाई आपले सारे ऐश्वर्य, धनदौलत, श्रीमंती सोडून दैत्यांचा संहार करण्यासाठी पुढे सरसावली. महाराष्ट्रातील  दुःखीतांची, अश्रितांची, अनाथांची व्यथा जाणणारी बया म्हणजेच जिजाबाई, शहाजीराजांची बायको. शिवाजी महाराजांच्या माँसाहेब. 
          जिजाबाईंना स्वराज्याचे डोहाळे लागले.  त्यांना आता आपल्या उदरी राम किंवा कृष्ण जन्म घेऊन या दैत्यांचा संहार करेल असे वाटू लागले आणि तो दिवस म्हणजे शुक्रवार दिनांक १९ फेब्रूवारी १६३०. या दिवशी जिजाबाईंनी शिवनेरी गडावर एका पुत्राला जन्म दिला. तो पुत्र म्हणजे शिवाजी महाराज. शिवबा मोठा होवू लागला तसा आईसाहेबांनी त्याला खेळायला मातीचे हत्ती, घोडे दिले. शिवबाला लुटूपुटूची लढाई करायला लावायच्या रात्री झोपताना रामाच्या, कृष्णाच्या, मारुतीच्या गोष्टी सांगायच्या. जिजाबाई शिवबाला एक स्वप्न बघायला लावायच्या ते स्वप्न म्हणजे स्वराज्य. जिजाबाईंमुळे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

















































Sunday, December 1, 2019

जनादेशाचा अवमान

         


निवडणुकीआधी 


निवडणूकीनंतर 
जनादेशाचा अवमान 

          आताच्या निवडणुकीत राज्यातील लोकांनी भाजप सेना युतीला बहुमत देऊन सत्ता स्थापन करण्याची संधी दिली होती. भाजपला १०५ जागा म्हणजेच सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर बसावे लागले तर शिवसेनेला राष्ट्रवादी  काँग्रेस व काँग्रेस यांचे बरोबर हातमिळवणी   करून सत्ता स्थापन करावी लागली आहे. खरं तर भाजप सेना सत्तेवर येवून राहिलेली कामे मार्गी लागतील व दोघे मिळून चांगल्या प्रकारे राज्य चालवतील असा जनादेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना तर बहुमत नसतानासुध्दा सत्तेत यावे लागले आहे. 
          या घडामोडींना भाजप व शिवसेना जबाबदार आहेत. भाजपने आमचाच मुख्यमंत्री हवा, शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद देणार नाही हा हट्टाहास केला तर शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसली. भाजप सेनेने यावर तोडगा काढणेऐवजी दोघेही मुख्यमंत्री पदासाठी भांडत बसले व जनतेने दिलेली सत्तास्थापनेची सोन्यासारखी संधी गमावून बसले. 
         राज्यातील लोकांना यावेळी गलिच्छ राजकारण बघायला मिळाले. निवडणुकीआधी चारही पक्ष एकमेकांवर शिंतोडे उडवत होते, उकाळ्या पाकळ्या काढत होते, खालच्या थराला जावून निंदानालस्ती करत होते. तेच पक्ष नंतर सत्तास्थापनेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत होते, हात मिळवणी करत होते. भाजपने राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेवून सत्ता स्थापन केली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो हे चारही पक्षांनी दाखवून दिले आहे. या सत्ता स्थापनेच्या खेळात जनता मात्र मुर्ख ठरली आहे. चारही पक्षांनी मिळून जनतेच्या मतांचा अपमान केला आहे. जनादेशाचा अवमान केला आहे.

 संतोष वसंत जोशी 
सायली रेसिडन्सी, गंगापुरी
वाई, जिल्हा सातारा

















 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...