Friday, December 13, 2019

स्वराज्याचे शिलेदार -- जीजाबाई




स्वराज्याचे शिलेदार -- जीजाबाई 

          शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला शह देऊन स्वराज्य स्थापन केले. कधी गनिमी काव्याने तर कधी समोरासमोर लढाया करून मुघलांना पुरते नामोहरण केले. शिवाजी महाराजांकडे सैन्य फारच कमी होते, पण जे होते ते निधडया छातीचे होते. एकेकाच्या अंगात दहा हत्तीचे बळ होते. एक - एक मावळा हजाराला भारी होता. त्यांना सह्याद्रीवर दऱ्या - खोऱ्यांची, कडा - कपारींची संपूर्ण माहिती होती. शिवाजी महाराजांना याच शिलेदारांच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता आले. 
          शाहजहाँ दिल्लीचा बादशहा झाला. महमद आदिलशाह विजापूरचा बादशहा झाला तर निजामशाहीत फत्तेखान वजीर झाला. तिघेही अत्यंत क्रूर व कपटी होते. शहाजहानने दख्खनवर लढाया सुरु केल्या.तिघेही अंधाधुंद व जुलूमपणे राज्य करत होते. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या जात होत्या. मंदिरातील मूर्तींची विटंबना चालू होती. त्यांची तोडफोड चालू होती. आदिलशहाने धन, धान्य, गुरेढोरे, बायका, पोरं लुटली. काही बायका, पोरांना आपल्या स्वार्थासाठी बाटविले. त्यांच्यावर जबरदस्ती केली. मुघलांनी असा महाराष्ट्रात असा धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्र मनातल्या मनात रडत होता. तो वाट पाहत होता यातून आपल्याला कोण सोडवेल का ? आणि एक चमत्कार झाला. महाराष्ट्राचा हा शोक, आक्रोश बघून एक बाई आपले सारे ऐश्वर्य, धनदौलत, श्रीमंती सोडून दैत्यांचा संहार करण्यासाठी पुढे सरसावली. महाराष्ट्रातील  दुःखीतांची, अश्रितांची, अनाथांची व्यथा जाणणारी बया म्हणजेच जिजाबाई, शहाजीराजांची बायको. शिवाजी महाराजांच्या माँसाहेब. 
          जिजाबाईंना स्वराज्याचे डोहाळे लागले.  त्यांना आता आपल्या उदरी राम किंवा कृष्ण जन्म घेऊन या दैत्यांचा संहार करेल असे वाटू लागले आणि तो दिवस म्हणजे शुक्रवार दिनांक १९ फेब्रूवारी १६३०. या दिवशी जिजाबाईंनी शिवनेरी गडावर एका पुत्राला जन्म दिला. तो पुत्र म्हणजे शिवाजी महाराज. शिवबा मोठा होवू लागला तसा आईसाहेबांनी त्याला खेळायला मातीचे हत्ती, घोडे दिले. शिवबाला लुटूपुटूची लढाई करायला लावायच्या रात्री झोपताना रामाच्या, कृष्णाच्या, मारुतीच्या गोष्टी सांगायच्या. जिजाबाई शिवबाला एक स्वप्न बघायला लावायच्या ते स्वप्न म्हणजे स्वराज्य. जिजाबाईंमुळे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

















































No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...