Friday, September 23, 2022

अवीट गोडीचे गाणे -- हवास तू, हवास तू, हवास मज तू हवास तू


अवीट गोडीचे गाणे -- हवास तू, हवास तू, हवास मज तू हवास तू 

          ''हवास तू, हवास तू, हवास मज तू, हवास तू'' हे अवीट गोडीचे गाणे आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातील आहे. हे गीत जगदीश खेबूडकर यांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. हे गीत उमा व श्रीकांत मोघे यांचेवर चित्रित झाले आहे. 

          आम्ही जातो आमुच्या गावा हा चित्रपट १९६८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांनी केले आहे. या चित्रपटात उमा, श्रीकांत मोघे, सुर्यकांत मांढरे, धुमाळ, गणेश सोळंकी, रामचंद्र वर्दे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणी आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायली असून सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्यातीलच हे एक गीत आहे. 


हवास तू, हवास तू, हवास मज तू, हवास तू
प्रिया नाचते आनंदाने दूर उभा का उदास तू?

मदनासम हे रूप देखणे, शब्दाविण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन् प्रकाश तू

या तेजस्वी डोळ्यांमधुनी, भरदिवसा हो रात चांदणी
मुखचंद्राच्या कलाकलांनी, हासविणारा सुहास तू

तारुण्याच्या झाडावरती, मोहक होउनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी, करशील का रे प्रयास तू 
 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...