Saturday, November 30, 2019

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- नेम जया नाहीं एकादशी व्रत । (अभंग ३४)

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- नेम जया नाहीं एकादशी व्रत । (अभंग ३४)

नेम जया नाहीं एकादशी व्रत । जाणावें ते प्रेत सर्व लोकीं ।। १ ।।
त्याचे वय नित्य काळ लेखिताहे । रागें दात खाय कराकरा ।। २ ।।
जयाचिये द्वारी तुळशीवृंदावन । नाहीं ते स्मशान गृह जाण ।। ३ ।।
विठोबाचे नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचे ।। ४ ।।
तुका म्हणे त्याचे काष्ठ हात पाय । कीर्तना नाव जाय हरिचिया ।। ५ ।।

अर्थ : "ज्या पुरुषाला एकादशीच्या व्रताचा नेम नाही तो पुरूष सर्व लोकात प्रेतवत आहे. त्या पुरूषाचे जाणाऱ्या आयुष्याचे दिवस काळ नेहमी मोजत असतो आणि अतिशय रागाने त्याच्यावर दात खातो" या ओवीतून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे कि जो कोणी एकादशीला (आषाढी, कार्तिकी) पंढरपूरला जाण्याचे व पांडुरंगाला भेटण्याचे व्रत करत नाही (आषाढी, कार्तिकी वारी करत नाही) त्याच्या जगण्यात अर्थ नाही. तो पुरूष म्हणजे एक प्रकारचा नश्वर जीवच आहे. तो सर्व लोकात प्रेतवत आहे. त्याच्यामागे काळ यमदूतासारखा उभा असतो आणि तो जे दिवस जगत असतो ते दिवस काळ मोजत असतो (तुकाराम महाराजांना ते दिवस काळासारखे वाटतात). काळ रागाने त्याच्याकडे बघत असतो. 
          महिन्याला दोन याप्रमाणे वर्षात २४ एकादशी असतात. यात आषाढी व कार्तिकी एकादशी सगळ्यात पवित्र मानली जाते. एकादशीच्या दिवशी उपवास करावा, विठ्ठलाचे नामःस्मरण करावे, भजन-कीर्तन करावे, हरिपाठ वाचावा तसेच आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करावी व विठ्ठलाचे दर्शन घ्यावे हे व्रत केल्याने निश्चित पुण्य लागते. 
          "ज्याच्या घरासमोर तुळशीवृंदावन नाही ते घर स्मशानावत आहे" याचा अर्थ आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीला महत्व आहे. आपण तुळशीला पवित्र मानले आहे. तुळस विष्णूची आवडती वनस्पती आहे. तिचा उपयोग पुजेसाठी व औषधासाठी होतो. वारकारीसुद्धा पांडुरंगाला भेटायला जाताना बरोबर तुळशीवृंदावन घेवून जातात. तुकाराम महाराजांच्या मते ज्याला तुळशीचे महत्व पटले नाही, त्याच्या घरासमोर तुळशीवृंदावन नाही त्याचे घर स्मशानासारखे रखरखीत आहे तसेच त्याच्या कुळामध्ये विष्णू उपासक नसेल तर त्याचे आयुष्य नदीत बुडून जाईल. 
          "ज्याचे तोंड विठ्ठलनामाचा उच्चार करीत नाही ते तोंड नाही, ते चांभाराचे कातडे भिजवण्याचे कुंड आहे. जो पुरूष हरिकीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लाकडे आहेत." तुकाराम महाराजांनी या ओवीतून पांडुरंगाच्या भक्तीबद्दल असे म्हणले आहे कि, ज्याचे तोंड विठ्ठलनामाचा उच्चार करीत नाही (तोंडाने पांडुरंगाचे नाव घेत नाही) ते तोंड सगळ्यात वाईट आहे इतके वाईट कि चांभार ज्या कुंडात कातडे भिजवतो व त्यामुळे कुंडाला दुर्गंधी येते त्याप्रमाणे त्याच्या तोंडाला दुर्गंधी येते. तसेच जो पुरूष हरिकीर्तनाला (विठ्ठालाच्या कीर्तनाला) जात नाही त्याचे हातपाय धडधाकट असूनसुध्दा काही कामाचे नाहीत. ते निर्जीवच (लाकडासमान) आहेत .







































1 comment:

  1. कुळामध्ये विष्णू उपासक नसेल तर त्याचे आयुष्य नदीत बुडून जाईल.


    असं कोणी तर्क काढलाय नदीत बुडून जाईल.

    आणि प्रत्येक वेळी तुकाराम महाराज ओवीतून सांगतात.... असं लिहलंय. अभंगाचा भावार्थ सांगताय तुम्ही लक्षात ठेवा. कधी उत्तर्धात तर कधी प्रकरण सोडुन अर्थ करताय. असं काहीं करू नका. राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

    ReplyDelete

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...