Saturday, January 14, 2023

 दोस्ताना -- सलामत रहे दोस्ताना हमारा

 

 दोस्ताना -- सलामत रहे दोस्ताना हमारा 

          दोस्ताना हा चित्रपट १७ ऑक्टोबर १९८० रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता यश जोहर असून दिग्दर्शक राज खोसला आहेत. सलीम-जावेद यांनी कथा लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटातील गाणी मोहमद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर यांनी गायली आहेत. अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, झीनत अमान, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, प्राण यांच्या मुख्य भुमिका आहेत. 

          हा चित्रपट अमिताभ व शत्रुघ्न सिन्हा यांच्या मैत्रीवर घेतलेला आहे. या दोघांच्या मैत्रीवर आधारीत 'बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा' हे गाणे आनंद बक्षी यांनी लिहिले आहे तर किशोर कुमार व मोहमद रफी यांनी गायले आहे. अमिताभ व शत्रुघ्न सिन्हावर चित्रित केलेले गाणे आजही पसंत केले जाते. 

कथानक -- 

          विजय ( अमिताभ बच्चन ) आणि रवी ( शत्रुघ्न सिन्हा ) चांगले मित्र आहेत आणि दोघेही एकमेकांवर खूप विश्वास ठेवतात. विजय हा पोलिस अधिकारी आहे आणि रवी हा वकील आहे. विजय गुन्हेगारांना पकडतो, तर रवी त्यांना बाहेर काढतो. त्याला डागा ( प्रेम चोप्रा ) ने घेतले आहे . एके दिवशी विजय आणि रवी शीतलला ( झीनत अमान ) वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेळी भेटतात आणि दोघेही तिच्या प्रेमात पडतात. विजयने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि शीतलचेही विजयवर प्रेम आहे, तर रवीचे शीतलवर एकतर्फी प्रेम आहे.

          रवी विजयला शीतलवरील त्याच्या प्रेमाबद्दल सांगतो, विजय हे ऐकून पुर्णपणे हादरतो व हवालदिल होतो  परंतु रवीसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करण्याचा निर्णय घेतो. तथापि, रवीला विजय आणि शीतलचा फोटो दाखवून डागा विजय आणि रवीची मैत्री भडकवतो. दोघांच्यात गैरसमज निर्माण करून दोघांच्या मैत्रीत वितुष्ट आणतो.  विजय आणि रवी पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी बनले आहेत. बाकी चित्रपटात विजय आणि डागा यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. गैरसमज झाल्यानंतर, रवी डागाची बाजू घेतो, परंतु नंतर त्याला सत्य कळते आणि त्याच्या कृत्याचे प्रायश्चित करतो

          डागा रवी आणि शीतलला पकडतो मग विजय आपल्या मित्राला वाचवण्यासाठी तिथे येतो पण तो देखील अडकतो त्यानंतर रवी आणि विजय कसा तरी मोकळा होतो आणि डागा तिथून पळून जातो, रवी आणि विजयने डागाचा पाठलाग करतात  तेव्हा डागा आणि विजयमध्ये भांडण होते. डागा गोळी मारण्याचा प्रयत्न करतो विजय अडकतो पण विजय आधीच सावध होतो आणि तो डागाला गोळी मारतो, डागा मारला जातो मग विजय आणि रवी यांच्यातील गैरसमज दूर होतात व दोघे परत दोघे मित्र बनतात. एकमेकांना मिठी मारतात.

 

गुंडोंकी सिटीया नही बजेगी तो क्या  मंदिरोकी घंटी बजेगी --

          अमिताभच्या संवादात एक वेगळीच जादू असते. त्याचे संवाद ऐकावेशे वाटतात. सिनेमातील कोणताही प्रसंग असो तो आपल्या संवादाने प्रेक्षकांच्या टाळ्या घेतो. या चित्रपटातील पुढील प्रसंगातही आपल्या संवादाने प्रेक्षकांची मने जिंकली. 

          झीनत  अमानला बघून पेंटल शिट्टी मारतो व हम तुम एक कमरे मे बंद हो हे गाणे म्हणत तीला छेडतो. झीनत अमान त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते. अमिताभ पेंटलला कोठडीत बंद करायला हवालदाराला सांगतो व झीनत अमानच्या कपड्यांकडे बघतो व म्हणतो, "लडकियोंको छेडणेवाले ऐसे थर्डक्लास गुंडोन्को पकडना हमारा फर्ज है लेकिन  लडकियोंको भी फर्ज है, इस तरह के कपडे पहेनकर सडकोपर निकलोगी तो गुंडोंकी सिटीया नही बजेगी तो क्या  मंदिरोकी घंटी बजेगी" 

          सर्व कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला. अमिताभ बच्चन व शत्रुघ्न सिन्हा यांनी चांगला अभिनय केल्यामुळे दोघांचे नाव फिल्मफेयर तर्फे दिल्या जाणाऱ्या 'बेस्ट ऍक्टर (सर्वश्रेष्ठ अभिनेता)' पुरस्कारासाठी नामांकित झाले.

         

 

 

 


  'बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा' सुपर हिट गाणे

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...