Saturday, November 21, 2020

 तुकाराम महाराज गाथा 

                संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांद्वारे सोप्या भाषेत जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी जवळ जवळ चार ते साडे चार अभंग लिहिले. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. 

               तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहे. 

                वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. तुकाराम   महाराजांचे अभंग १३ दिवस पाण्यात होते. या १३ दिवसात तुकाराम महाराज अन्न पाण्याविना नदीकाठी बसून होते. लोकही त्यांच्याबरोबर बसून होते व त्यांचे अभंग म्हणत होते. चौदाव्या दिवशी एक चमत्कार घडला व अभंग पाण्यावर तरंगू लागले. हे अभंग बघून तुकाराम महाराजांसह इतर जमलेल्या लोकांना आनंद झाला. त्यांनी अभंगांची गावातून मिरवणूक काढली. हा चमत्कार बघून रामेश्वर भटांनीही त्यांचे शिष्यत्व पत्करले. 

               

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Monday, November 16, 2020

तुकाराम महाराज ह्यांचे हातात तंबोरा(वीणा) का आहे?

          तुकाराम महाराज ह्यांचे हातात तंबोरा(वीणा) का आहे?

 

           तुकाराम महाराज विठ्ठलाची भक्ती करू लागले. ते विठ्ठलाचे भजन कीर्तन गाऊ लागले. भजन कीर्तन गाण्यासाठी त्यांना तंबोरा आणि चिपळ्यांची साथ मिळू लागली. त्यांनी आपल्या एका अभंगात "टाळ चिपळ्या हेच आमचे धन" असा उल्लेख केला आहे. भजन कीर्तन गाताना ते नेहमी तंबोराच्या तारा छेडत असत त्यामुळे त्यांना अभंग गाताना किंवा भजन कीर्तन गाताना ब्रह्मानंदी टाळी लागत असत. ते अगदी तल्लीन होऊन जात.

 

Saturday, November 14, 2020

 

अवीट गोडीचे गाणे - सेतू बांधा रे सागरी - गीतरामायण 

 

           'सेतू बांधा रे सागरी' हे गीत गीतरामायण मधील आहे. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या अवीट आवाजात हे गीत गायले आहे व त्यांनीच हे गीत संगीतबध्द केले आहे. हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले आहे. 

          गीत रामायण हा कार्यक्रम १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीवर प्रसारित झाला. या कार्यक्रमात एकूण ५६ गीते प्रसारित झाली. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे हि सर्व गीते ग. दि. माडगुळकर यांनी लिहिली असून बाबूजी यांनी संगीतबध्द केली व आपल्या अवीट आवाजात गायली. गीतरामायणातील सर्वच गाणी अवीट गोडीची असून कानांना तृप्त करणारी आहेत. त्यातीलच हे एक गीत. 

बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं

गिरिराजांचे देह निखळूनी

गजांगशा त्या शिळा उचलुनी

जलांत द्या रे जवें ढकलुनी

सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी

फेका झाडें, फेका डोंगर

पृष्ठीं झेलिल त्यांना सागर

ओढा पृथ्वी पैलतटावर

वडवाग्नी तो धरील माथीं सेतू शेषापरी

रामभक्ति ये दाटुनि पोटीं

शततीर्थांच्या लवल्या पाठी

सत्कार्याच्या पथिकासाठीं

श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी

नळसा नेता सहज लाभतां

कोटी कोटी हात राबतां

प्रारंभी घे रूप सांगता

पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी

चरण प्रभुचे जळांत शिरतां

सकळ नद्यांना येइ तीर्थता

आरंभास्तव अधिर पूर्तता

शिळा होउनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी

गर्जा, गर्जा हे वानरगण!

रघुपती राघव, पतीतपावन

जय लंकारी, जानकिजीवन

युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी

सेतू नच हा क्रतू श्रमांचा

विशाल हेतु श्रीरामांचा

महिमा त्यांच्या शुभनामाचा

थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी

बुभुःकारुनी पिटवा डंका

विजयी राघव, हरली लंका

मुक्त मैथिली, कशास शंका

सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी

 



 


तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...