Sunday, December 13, 2020
बोधकथा -- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
Saturday, December 12, 2020
बोधकथा -- सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्याच्या पुरस्कार
बोधकथा -- सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्याच्या पुरस्कार
एकदा सम्राट अशोकाने सर्वश्रेष्ठ शासकाला म्हणजेच राज्यकर्त्याला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या सर्व राज्यांच्या शासकांना निमंत्रण पाठवले. सारे शासक ठरल्यावेळी दरबारात हजर झाले. अशोकाने त्यांना त्यांच्या कामगिरीविषयी विचारले.
एक शासक म्हणाला कि, त्याच्या शासनकाळात राज्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. दुसऱ्या शासकाने सांगितले कि, त्याच्या काळात सुवर्णमुद्रांचे भांडार स्थापन केले आहे. तिसऱ्याने सांगितले कि, त्याने आधुनिक शस्त्रांची निर्मिती केली आहे. सर्वांनी आपली कामगिरी सांगितली.
शेवटी एक शासक पडत्या स्वरात म्हणाला, ना मी राज्याचा खजिना सुवर्णमुद्रांनी भरू शकलो ना उत्पन्न दुप्पट करू शकलो तसेच मी आधुनिक शस्त्रांची निर्मितीही केली नाही. उलट माझ्या शासन काळात राज्याचा खजिना कमी झाला आहे. मी खजिन्यातील धन शाळा आणि रुग्णालये उभारण्यासाठी खर्च केला आहे. माझ्या राज्यात वृक्ष लावण्यासाठी मी खूप खर्च केला आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्याचाही प्रयत्न केला आहे. यामुळे प्रजा आनंदी आहे. याशिवाय मी कोणतीही कामगिरी केली नाही.
सम्राट अशोकाने त्याला विजयी घोषित केले व सांगितले, "खरे तर तूच खरा सर्वश्रेष्ठ शासक आहे. प्रजेला सुखी बनवणे व त्यांना उपजीविकेची साधने मिळवून देणे हेच प्रत्येक शासकाचे कर्त्यव्य असते. बाकीच्या शासकांनी राज्यसत्ता बळकट होईल ते सारे मिळवण्याचा प्रयत्न केला व प्रजा कमकुवत केली हे मला मंजूर नाही. तू माझा आदर्श आत्मसात केला याचा मला आनंद वाटतो. इतर शासकांनीही या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे." हे ऐकून इतर शासकांनी लाजेने आपल्या माना झुकवल्या.
Saturday, November 21, 2020
तुकाराम महाराज गाथा
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांद्वारे सोप्या भाषेत जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी जवळ जवळ चार ते साडे चार अभंग लिहिले. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे.
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहे.
वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. तुकाराम महाराजांचे अभंग १३ दिवस पाण्यात होते. या १३ दिवसात तुकाराम महाराज अन्न पाण्याविना नदीकाठी बसून होते. लोकही त्यांच्याबरोबर बसून होते व त्यांचे अभंग म्हणत होते. चौदाव्या दिवशी एक चमत्कार घडला व अभंग पाण्यावर तरंगू लागले. हे अभंग बघून तुकाराम महाराजांसह इतर जमलेल्या लोकांना आनंद झाला. त्यांनी अभंगांची गावातून मिरवणूक काढली. हा चमत्कार बघून रामेश्वर भटांनीही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
Monday, November 16, 2020
तुकाराम महाराज ह्यांचे हातात तंबोरा(वीणा) का आहे?
तुकाराम महाराज ह्यांचे हातात तंबोरा(वीणा) का आहे?
तुकाराम महाराज विठ्ठलाची भक्ती करू लागले. ते विठ्ठलाचे भजन कीर्तन गाऊ लागले. भजन कीर्तन गाण्यासाठी त्यांना तंबोरा आणि चिपळ्यांची साथ मिळू लागली. त्यांनी आपल्या एका अभंगात "टाळ चिपळ्या हेच आमचे धन" असा उल्लेख केला आहे. भजन कीर्तन गाताना ते नेहमी तंबोराच्या तारा छेडत असत त्यामुळे त्यांना अभंग गाताना किंवा भजन कीर्तन गाताना ब्रह्मानंदी टाळी लागत असत. ते अगदी तल्लीन होऊन जात.
Saturday, November 14, 2020
अवीट गोडीचे गाणे - सेतू बांधा रे सागरी - गीतरामायण
'सेतू बांधा रे सागरी' हे गीत गीतरामायण मधील आहे. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या अवीट आवाजात हे गीत गायले आहे व त्यांनीच हे गीत संगीतबध्द केले आहे. हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले आहे.
गीत रामायण हा कार्यक्रम १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीवर प्रसारित झाला. या कार्यक्रमात एकूण ५६ गीते प्रसारित झाली. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे हि सर्व गीते ग. दि. माडगुळकर यांनी लिहिली असून बाबूजी यांनी संगीतबध्द केली व आपल्या अवीट आवाजात गायली. गीतरामायणातील सर्वच गाणी अवीट गोडीची असून कानांना तृप्त करणारी आहेत. त्यातीलच हे एक गीत.
बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं
गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी
फेका झाडें, फेका डोंगर
पृष्ठीं झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्नी तो धरील माथीं सेतू शेषापरी
रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थांच्या लवल्या पाठी
सत्कार्याच्या पथिकासाठीं
श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी
नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी
चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येइ तीर्थता
आरंभास्तव अधिर पूर्तता
शिळा होउनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी
गर्जा, गर्जा हे वानरगण!
रघुपती राघव, पतीतपावन
जय लंकारी, जानकिजीवन
युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी
सेतू नच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी
बुभुःकारुनी पिटवा डंका
विजयी राघव, हरली लंका
मुक्त मैथिली, कशास शंका
सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी
Monday, October 26, 2020
अवीट गोडीचे गाणे -- विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
अवीट गोडीचे गाणे -- विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
हे भावगीत गायले आहे माणिक वर्मा यांनी. या गीताला संगीत दिले आहे बाळ माटे यांनी. हे गीत लिहिले आहे योगेश्वर अभ्यंकर यांनी.
जेव्हा प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परतात तेव्हा अयोध्या नगरी आनंदाने फुलून उठते. प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्या नगरीत परत येतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात आनंद उत्पन्न झालेला असतो. अयोध्या नगरीत मंगलमय वातावरण तयार झालेले असते. प्रत्येकाच्या घरावर गुढयातोरणे उभारल्या जातात. घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. गुलाल उधळला जातो. सनई चौघडे वाजवले जातात. फुलांचा सडा शिंपडला जातो. आपला आवडता राजा घरी परत आला आहे म्हणून प्रभू रामचंद्र कि जय असा गजर सगळीकडे चालू असतो. एकूणच संपुर्ण अयोध्या नागरी प्रभू रामचंद्रांच्या भक्तीत तल्लीन झालेली आहे.
विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी
गुलाल उधळून नगर रंगले, भक्तगणाचे थवे नाचले
रामभक्तीचा गंध दरवळे, गुढ्यातोरणे घरोघरी ग
आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी, आरती ओवाळती नारी
श्रीरामाचा गजर होऊनी, पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी, भक्ती युगाची ललकारी ग
Saturday, October 10, 2020
तुकाराम महाराज अभंग -- चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।।
तुकाराम महाराज अभंग -- चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।।
चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।। १ ।।
बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगो काय ।। २ ।।
मनाचे तळमळे । चंदनेही अंग पोळे ।। ३ ।।
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ।। ४ ।।
"चित्ताचे जर समाधान असेल तर विषवत असणारे दुःख सोन्यासारखे वाटते." या ओवीतून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे कि, जर आपले मन समाधानी असेल, मनात कुठलाही लोभ नसेल तर आपल्याला जे दुःख होईल ते विषासारखे न वाटता सोन्यासारखे वाटेल म्हणजेच होणाऱ्या दुःखातूनही सुख वाटेल. "विषयाची हाव अतिशय असणे हे फार खोटे आहे." यातून असे सुचवायचे आहे कि एखादया गोष्टीबद्दल म्हणजेच संपत्ती, धन-द्रव्य, किंमती सुवर्णअलंकार याबद्दल अतिशय हाव बाळगली किंवा लोभ सुटला तर तो वाईटच आहे कारण तो शेवटी विनाशाकडे नेतो. म्हणूनच जास्त हाव न बाळगता जे आहे त्यातच समाधान मानले म्हणजे वाईट वाटणार नाही. "मन जर तळमळ करीत असेल तर चंदनाचे उटीनेही अंग भाजते. मन अस्वस्थ असेल तर अन्य सुखोपचाराची पूजा केल्याने पीडा होते." तुकाराम महाराजांना असे सांगायचे आहे कि, एखादया गोष्टीबद्दल म्हणजेच संपत्ती, धन-द्रव्य, किंमती सुवर्णअलंकार याबद्दल अतिशय हाव बाळगली किंवा लोभ सुटला व ती गोष्ट मिळवण्यासाठी मन तळमळ करीत असेल किंवा आतल्या आत जळत असेल तर चंदनासारख्या थंडगार वस्तूने सुद्धा आग शांत होणार नाही. व एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून मन अस्वस्थ होत असेल तर दुसरे कुठलेही सुख पुढे टाकले तरी मनाचे समाधान होणार नाही. उलट ती गोष्ट मिळत नसल्याने दुःखच होणार.
तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥
तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...
-
तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- नेम जया नाहीं एकादशी व्रत । (अभंग ३४) नेम जया नाहीं एकादशी व्रत । जाणावें ते प्रेत सर्व लोकीं ।। १ ...
-
तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा ।
-
तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...






