Saturday, May 18, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अफसाना लिख रही हूँ


 अवीट गोडीचे गाणे -- अफसाना लिख रही हूँ - 

            'अफसाना लिख रही हूँ' हे दर्द चित्रपटातील गीत आहे.  हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्दुल रशीद करदार यांनी केले. या चित्रपटाची निर्मिती करदार प्रोडक्शनने केली. या चित्रपटातील गीते शकील बदायूनी यांनी लिहिली असून नौशाद यांनी संगीत  दिले आहे. या चित्रपटातील गीते शमशाद बेगम, सुरैया आणि उमा देवी यांनी गायली आहेत. 

            अफसाना लिख रही हूँ हे गीत उमा देवी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेले आहे. उमा देवी या पुढे टून टून म्हणून एक विनोदी अभिनेत्री म्हणून पुढे आल्या.


 

अफ़सान लिख रही हूँ दिल-ए-बेक़रार का

आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

जब तू नहीं तो कुछ भी नहीं है बहार में
जी चाहता है मूँह भी न देखूँ बहार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

हासिल हैं यूँ तो मुझको ज़माने की दौलतें
लेकिन नसीब लाई हूँ इक सोग़वार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

आजा कि अब तो आँख में आँसू भी आ गये
साग़र छलक उठा मेरे सब्र-ओ-क़रार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

 Movie/Album: दर्द (1947)
Music By:
नौशाद
Lyrics By:
शकील बदायुनी
Performed By:
उमा देवी
















तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सावळे मनोहर कैं देखेन ।।

 



 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सावळे मनोहर कैं देखेन ।।

गरुडाचे वारिके कसे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ।। १ ।।   
बरविया बरवंटा घनमेघ सावळा । वैजयंती माळा गळां शोभे ।। २ ।।
मुगुट माथां कोटी सूर्याचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ।। ३ ।।
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ।। ४ ।।
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ।। ५ ।।
तुका म्हणे नव्हे आणिकां सारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ।। ६ ।।

           तुकाराम महाराजांची विठ्ठलावरील भक्ती पराकोटीला पोचलेली आहे. त्यांच्या मुखातून सतत विठ्ठलाचे नामस्मरण चालू असते. ते भजन कीर्तनही विठ्ठलाचेच गात असतात. त्यांचे सर्व सुख आता विठ्ठल झाला आहे. त्यांना आता विठ्ठलाशिवाय कशातच सुख दिसत नाही. विठ्ठल आता त्यांचा सखा झाला आहे. म्हणूनच ते विठ्ठलाजवळ सतत गाराने गात असतात. विठ्ठलाजवळ हट्ट करत असतात. विठ्ठलसुद्धा त्यांचा हट्ट प्रेमाने पुरवत असतो. त्यांचे व विठ्ठलाचे एक अलौकिक नाते तयार झाले आहे. 
          तुकाराम महाराजांनाही आता विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. कधी एकदा विठ्ठलाचे गरुडरूपी घोडयावर आरूढ झालेले, कासेला(कंबरेला) पीतांबर नेसलेले, मनाला हरण करणारे असे शामसुंदर रूप केव्हां पाहीन असे तुकाराम महाराजांना झाले आहे. 
            तुकाराम महाराजांनी या अभंगात विठ्ठलाचे वर्णन किती सुंदर केले आहे. ते म्हणतात, उत्तमात उत्तम असे मेघासारखे शाम असणारे व त्याच्या गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे. मस्तकावर कोटीसूर्याच्या तेजाप्रमाणे चकाकणारा असा मुकुट परिधान केला आहे व गळ्यामध्ये निर्मळ कौस्तुभमणी शोभत आहे. श्रीमुख सर्व सुखाच्या रसाचे केवळ ओतले आहे म्हणजेच विठ्ठलाचे मुख(श्रीमुख) पाहिल्यावर सर्वसुखाचा आनंद प्राप्त होतो. विठ्ठलाच्या डाव्या हाताला वामांगी रखुमाईदेवी उभी आहे. दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर उभे राहून विठ्ठलाची कीर्ती वर्णन करीत आहेत. पोवाडे गात आहेत. असा अन्य कोणासारखाही म्हणता येणार नाही असा तोच माझा प्रिय सखा पांडुरंग आहे. 













 












 









 

Saturday, May 11, 2019

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

          टिळक लहान असतानाची गोष्ट वर्गात काही टारगट मुलांनी शेंगा खाऊन फोलपटे इतरत्र टाकली. गुरुजी वर्गात आले. त्यांनी पडलेली फोलपटे पाहिली. ते खूप चिडले. त्यांनी प्रत्येक मुलाला विचारून फोलपटे उचलायला लावली. ते टिळकांजवळ आले व टिळकांना विचारले की तू शेंगा खाल्ल्या का? टिळक न घाबरता म्हणाले कि, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपटे उचलणार नाही. असे लहानपणापासून बाणेदार असलेले टिळक मोठेपणी श्रेष्ठ दर्जाचे राष्ट्रीय चळवळीचे नेते, मुत्सद्दी राजकारणी, प्रभावशाली पत्रकार तसेच तत्वज्ञही झाले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ज्यांची ज्यांची नोंद झाली किंवा ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यात लोकमान्य टिळकांचे नाव प्रथम घेता येईल. 
          लोकमान्य टिळकांचा जन्म १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांचे शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे झाले. त्यांच्याकडे अफाट कार्यक्षमता, तेजस्वी विचार, संघटनचातुर्य, असामान्य धैर्य व मुत्सद्दीगिरी हे गुण होते. या गुणांमुळेच त्यांनी भारतीय जनतेच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. लोकमान्य टिळकांनी पाहिले कि इंग्रज सरकार अशिक्षित जनतेवर अन्याय करीत आहेत. त्यांनी मग लोकांना शिक्षण दयायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी  फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. त्यात तरुण मुलांना शिक्षणाबरोबरच  स्वातंत्र्याचेही महत्व पटवून दयायला सुरवात केली. तसेच त्यांनी गावोगावी सभा घेऊन गावातील लोकांना व तरुण मुलांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून दयायला सुरवात केली. 
          'स्वराज्य  हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या मंत्राने त्यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या जनतेला जागे केले. त्यासाठी त्यांनी लोकांना शिक्षण दयायला सुरवात केली तसेच परदेशी मालावर बहिष्कार टाकला व स्वदेशी मालाचा पुरस्कार करायला सुरवात केली. लोकांनी एकत्र यावे व स्वातंत्र्याचे महत्व पटावे यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व छत्रपती शिवाजीमहाराज जयंती साजरी करायला सुरवात केली. ते इंग्रज सरकार विरोधात जहाल बोलत असत तसेच त्यांचे लेखनही जहाल होते. लोकशिक्षणासाठी त्यांनी 'केसरी' व 'मराठा' हि वर्तमानपत्रे चालू केली. 
          या वर्तमानपत्रातून ते इंग्रज सरकार विरोधात जहाल लेखन करू लागले. त्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगवासही भोगावा लागला. आपल्या जहाल देशप्रेमी विचारांनी त्यांनी सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षे मंडाले येथे तुरुंगात खितपत पडावे लागले. या काळातही त्यांनी लेखन सोडले नाही. या तुरुंगवासातही त्यांनी लोकांना समजेल असा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. 
          त्यांच्या जहाल वक्तव्यामुळे व लेखणीमुळे त्यांनी भारतीय लोकांच्या असंतोषाला वाचा फोडून इंग्रज सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ उभारली म्हणूनच त्यांना 'राजकीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असत. त्यांनी आपले सारे जीवन स्वातंत्र्यासाठी व जनतेच्या उद्धारासाठी घालवले. म्हणून लोकांनी त्यांना सन्मानाने 'लोकमान्य' हि पदवी दिली. 
               होमरूल लीग चळवळीत भाग, विलायतचा प्रवास व जनजागृतीसाठी देशभर प्रवास या दगदगीने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. त्यांची प्रकृती खालावत चालली. शेवटपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढत असताना त्यांना १९२० साली मृत्यूने कवटाळले.














 












 

























 












 

Friday, May 10, 2019

अवीट गोडीचे गाणे -- बाहों में चले आओ


अवीट गोडीचे गाणे -- बाहों में चले आओ

          अनामिका हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्देशक रघुनाथ झालानी होते व निर्माता ताहीर हुसेन होते. या चित्रपटात संजीव कुमार व जया भादुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील सर्व गीते मजरुह सुलतानपुरी यांनी  लिहिली होती तर संगीत राहुल देव बर्मन यांनी दिले होते. या चित्रपटातील गीते किशोर कुमार, आशा भोसले व लता मंगेशकर यांनी गायली आहेत. 'मेरी मेरी भिगी भिगी सी' हे गीत बिनाका गीतमाला १९७३ च्या कार्यक्रमात ४ थ्या नंबरवर होते तर 'बाहों में चले आओ' हे गीत बिनाका गीतमाला १९७३ च्या कार्यक्रमात ३६ व्या नंबरवर होते. 
           बाहों में चले आओ हे गीत लता मंगेशकर यांनी गायले असून राहुल देव बर्मन यांनी संगीत दिले आहे. संजीव कुमार व जया भादुरी यांच्यावर हे गीत चित्रीत झाले आहे.  

बाहों में चले आओ
बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा
ये आज का नहीं मिलन
ये संग है उम्र भर का
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा

चले ही जाना है
नज़र चुराके यूँ
फिर थामी थी साजन तुमने
मेरी कलाई क्यों
चले ही जाना है
नज़र चुराके यूँ
फिर थामी थी साजन तुमने
मेरी कलाई क्यों
किसी को अपना बना के छोड़
दे
ऐसा कोई नहीं करता
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा

कभी कभी कुछ तो
कहो पिया हमसे
के कम-से-कम आज तो खुलके
मिलो ज़रा हमसे
कभी कभी कुछ तो
कहो पिया हमसे
के कम-से-कम आज तो खुलके
मिलो ज़रा हमसे
है रात अपनी
जो तुम हो अपने
किसी का फिर हमें डर
क्या
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा
ये आज का नहीं मिलन
ये संग है उम्र भर का
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा










कथा विवेकानंदांची -- भाषणातील एकाग्रता




कथा विवेकानंदांची -- भाषणातील एकाग्रता 

          हि गोष्ट आहे नरेंद्र जेव्हा स्वामी विवेकानंद बनून अमेरिकेला गेले होते तेव्हाची. अमेरिकेच्या पश्चिम भागातील एका गावी व्याख्यान देताना विवेकानंद म्हणाले कि, "ज्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे तो सदा-सर्वकाळ शांत आणि  अविचलित राहतो. बाहेरच्या जगातील कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकत नाही."
          त्या व्याख्यानाला आलेल्या काही गुराखी पोरांनी त्यांचे हे म्हणणे ऐकले होते. म्हणून स्वामीजी जेव्हा त्यांच्या गावी व्याख्यानाला आले तेव्हा याबाबतीत त्यांची परीक्षा घेण्याचे त्या पोरांनी ठरवले. व्याख्यानासाठी स्वामीजींना एका पालथ्या टाकलेल्या टबावर उभे केले. व्याख्यान सुरु झाले आणि थोडयाच वेळात स्वामीजी त्या विषयाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेले. त्यावेळी या गुराखी पोरांनी मागून बंदुकीच्या गोळ्या झाडण्यास सुरवात केली. स्वामीजींच्या कानाजवळून त्या गोळ्या सूं सूं करीत जात होत्या, पण स्वामीजींना त्याचे भानही नव्हते. ते पूर्णपणे एकाग्र होऊन भाषण करीत होते. 
          जेव्हा व्याख्यान संपले आणि स्वामीजी खाली बसले, तेव्हा खजील होऊन ती पोरे पुढे आली आणि स्वामीजींची क्षमा मागून त्यांना म्हणाली, "आपण फार थोर आहात. आपण जे तोंडाने सांगता ते आचरणातही आणता."












 












 

Sunday, April 28, 2019

लेख -- महाराष्ट्र कोणाचा ?




 लेख -- महाराष्ट्र  कोणाचा ?

          'महाराष्ट्र  कोणाचा ?' ह्याचे उत्तर म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचा महाराष्ट्र. मराठी भाषेवर व मातीवर प्रेम करणाऱ्या माणसांचा. ज्यांच्या नासा-नसात व रक्तात महाराष्ट्र भिनला आहे त्यांचा. 
                     महाराष्ट्र हि संतांची भूमी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, गोरा कुंभार, चोखा मेळा, संत जनाबाई अशी संत मंडळी महाराष्ट्राला लाभली. यांच्या भजन, कीर्तन व ओव्यांनी महाराष्ट्राला शिकवण दिली. त्यांची पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच लाखोंहून अधिक वारकरी नित्यनेमाने दर आषाढी, कार्तिकेला आळंदी, देहूपासून पंढरपुरापर्यंत पायी वारी करतात. संत तुकडोजी महाराज यांनी भारुडाच्या माध्यमातून लोकजागृती केली. गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन समाजसेवा केली. 'जय जय रघुवीर समर्थ' अशी आर्त हाक देत शिवाजी महाराजांना व महाराष्ट्राला शिकवण दिली ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांचे 'मनाचे श्लोक' आजही  म्हणले जातात. सज्जनगडावर त्यांचे देहावसान  झाले. 
          आज महाराष्ट्रातून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते व संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे पोवाडे गायले जातात ते म्हणजे शिवाजी महाराज. अख्खा महाराष्ट्र मुसलमानांच्या तावडीत  होरपळत असताना शिवाजी महाराजांनी समोरासमोर आणि गनिमी काव्याने मोगलांशी लढून आपले स्वराज्य स्थापन केले. ज्यांनी अटकेपार झेंडे नेले व इंग्रजांशी दोन हात केले ते पुण्यातील राघोबादादा  पेशवे तसेच न्यायाबाबत एकनिष्ठ असणारे रामशास्त्री  प्रभुणे पुण्यातील होय. 
          आपल्या महाराष्ट्राला थोर संतांबरोबरच थोर समाजसुधारकांची  देणगी लाभली आहे. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महर्षी  धोंडो केशव कर्वे, सेनापती बापट, शाहूमहाराज, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि इतर बऱ्याच समाजसुधारकांनी दलितांसाठी, महिलांसाठी, महाराष्ट्रातील अनिष्ठ प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी धडपड केली. इंग्रजांविरुद्ध लढताना तुरुंगवासही भोगावा लागला. आदय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव हे फासावर लटकून शाहिद झाले. 
          आपल्या महाराष्ट्रात थोर साहित्यिक व विचारवंत जन्माला आले. पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, राम गणेश गडकरी, ना. सी. फडके, वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, ना. धो. महानोर, ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. महाराष्ट्राची गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी बरीच भावगीते, भक्तिगीते गायली. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे अजूनही डोळ्यातून पाणी काढते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून विश्वविक्रम केला. 
          महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा व लावणी. तमाशाद्वारे पूर्वी लोकजागृती केली जात असे. महाराष्ट्रात पहिल्यांदा तमाशा सुरु केला तो पठ्ठे बापूराव यांनी. आजसुद्धा काळू बाळू, दत्ता महाडिक, मंगला बनसोडे यांचे तमाशे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे लावणी. रोशन सातारकर, सुलोचना चव्हाण, यमुनाबाई वाईकर, सुरेखा पुणेकर यांनी लावणीला साज चढवला व लावणी अजरामर केली. 
          आपल्या महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. आपली राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राला ७२० कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. कोकणसारखा निसर्गसंपन्न व पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा प्रदेश लाभला आहे. महाराष्ट्रात एकूण ३५ जिल्हे आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपुर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, अक्कलकोट, अष्टविनायक अशी तीर्थक्षेत्र आहेत. पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान अशी थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रतापगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग, सिंहगड, पुरंदर असे किल्ले आहेत. अंजठा-वेरूळ लेण्या आहेत. 
          आपल्या महाराष्ट्राला संतांची, समाजसुधारकांची देणगी लाभली आहे. आपला महाराष्ट्र हा थोर विचारवंतांच्या विचारामुळे विकासाच्या दृष्टीने पावले टाकत आहे. महाराष्ट्राला कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने घेरले तसेच दंगलींना तर कधी दहशतवादाला धीराने तोंड दिले. महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरीही महाराष्ट्र कणखरपणे उभा राहिला. म्हणूनच आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान वाटतो व म्हणूनच आपण सारे बांधव अभिमानाने म्हणूया, 'जय जय महाराष्ट्र माझा । गर्जा महाराष्ट्र माझा ।।'












 
          











 

























          



































 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...