Saturday, May 18, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अफसाना लिख रही हूँ


 अवीट गोडीचे गाणे -- अफसाना लिख रही हूँ - 

            'अफसाना लिख रही हूँ' हे दर्द चित्रपटातील गीत आहे.  हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्दुल रशीद करदार यांनी केले. या चित्रपटाची निर्मिती करदार प्रोडक्शनने केली. या चित्रपटातील गीते शकील बदायूनी यांनी लिहिली असून नौशाद यांनी संगीत  दिले आहे. या चित्रपटातील गीते शमशाद बेगम, सुरैया आणि उमा देवी यांनी गायली आहेत. 

            अफसाना लिख रही हूँ हे गीत उमा देवी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेले आहे. उमा देवी या पुढे टून टून म्हणून एक विनोदी अभिनेत्री म्हणून पुढे आल्या.


 

अफ़सान लिख रही हूँ दिल-ए-बेक़रार का

आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

जब तू नहीं तो कुछ भी नहीं है बहार में
जी चाहता है मूँह भी न देखूँ बहार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

हासिल हैं यूँ तो मुझको ज़माने की दौलतें
लेकिन नसीब लाई हूँ इक सोग़वार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

आजा कि अब तो आँख में आँसू भी आ गये
साग़र छलक उठा मेरे सब्र-ओ-क़रार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ...

 Movie/Album: दर्द (1947)
Music By:
नौशाद
Lyrics By:
शकील बदायुनी
Performed By:
उमा देवी
















तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सावळे मनोहर कैं देखेन ।।

 



 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सावळे मनोहर कैं देखेन ।।

गरुडाचे वारिके कसे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ।। १ ।।   
बरविया बरवंटा घनमेघ सावळा । वैजयंती माळा गळां शोभे ।। २ ।।
मुगुट माथां कोटी सूर्याचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ।। ३ ।।
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ।। ४ ।।
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ।। ५ ।।
तुका म्हणे नव्हे आणिकां सारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ।। ६ ।।

           तुकाराम महाराजांची विठ्ठलावरील भक्ती पराकोटीला पोचलेली आहे. त्यांच्या मुखातून सतत विठ्ठलाचे नामस्मरण चालू असते. ते भजन कीर्तनही विठ्ठलाचेच गात असतात. त्यांचे सर्व सुख आता विठ्ठल झाला आहे. त्यांना आता विठ्ठलाशिवाय कशातच सुख दिसत नाही. विठ्ठल आता त्यांचा सखा झाला आहे. म्हणूनच ते विठ्ठलाजवळ सतत गाराने गात असतात. विठ्ठलाजवळ हट्ट करत असतात. विठ्ठलसुद्धा त्यांचा हट्ट प्रेमाने पुरवत असतो. त्यांचे व विठ्ठलाचे एक अलौकिक नाते तयार झाले आहे. 
          तुकाराम महाराजांनाही आता विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. कधी एकदा विठ्ठलाचे गरुडरूपी घोडयावर आरूढ झालेले, कासेला(कंबरेला) पीतांबर नेसलेले, मनाला हरण करणारे असे शामसुंदर रूप केव्हां पाहीन असे तुकाराम महाराजांना झाले आहे. 
            तुकाराम महाराजांनी या अभंगात विठ्ठलाचे वर्णन किती सुंदर केले आहे. ते म्हणतात, उत्तमात उत्तम असे मेघासारखे शाम असणारे व त्याच्या गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे. मस्तकावर कोटीसूर्याच्या तेजाप्रमाणे चकाकणारा असा मुकुट परिधान केला आहे व गळ्यामध्ये निर्मळ कौस्तुभमणी शोभत आहे. श्रीमुख सर्व सुखाच्या रसाचे केवळ ओतले आहे म्हणजेच विठ्ठलाचे मुख(श्रीमुख) पाहिल्यावर सर्वसुखाचा आनंद प्राप्त होतो. विठ्ठलाच्या डाव्या हाताला वामांगी रखुमाईदेवी उभी आहे. दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर उभे राहून विठ्ठलाची कीर्ती वर्णन करीत आहेत. पोवाडे गात आहेत. असा अन्य कोणासारखाही म्हणता येणार नाही असा तोच माझा प्रिय सखा पांडुरंग आहे. 













 












 









 

Saturday, May 11, 2019

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

          टिळक लहान असतानाची गोष्ट वर्गात काही टारगट मुलांनी शेंगा खाऊन फोलपटे इतरत्र टाकली. गुरुजी वर्गात आले. त्यांनी पडलेली फोलपटे पाहिली. ते खूप चिडले. त्यांनी प्रत्येक मुलाला विचारून फोलपटे उचलायला लावली. ते टिळकांजवळ आले व टिळकांना विचारले की तू शेंगा खाल्ल्या का? टिळक न घाबरता म्हणाले कि, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपटे उचलणार नाही. असे लहानपणापासून बाणेदार असलेले टिळक मोठेपणी श्रेष्ठ दर्जाचे राष्ट्रीय चळवळीचे नेते, मुत्सद्दी राजकारणी, प्रभावशाली पत्रकार तसेच तत्वज्ञही झाले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ज्यांची ज्यांची नोंद झाली किंवा ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यात लोकमान्य टिळकांचे नाव प्रथम घेता येईल. 
          लोकमान्य टिळकांचा जन्म १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांचे शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे झाले. त्यांच्याकडे अफाट कार्यक्षमता, तेजस्वी विचार, संघटनचातुर्य, असामान्य धैर्य व मुत्सद्दीगिरी हे गुण होते. या गुणांमुळेच त्यांनी भारतीय जनतेच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. लोकमान्य टिळकांनी पाहिले कि इंग्रज सरकार अशिक्षित जनतेवर अन्याय करीत आहेत. त्यांनी मग लोकांना शिक्षण दयायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी  फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. त्यात तरुण मुलांना शिक्षणाबरोबरच  स्वातंत्र्याचेही महत्व पटवून दयायला सुरवात केली. तसेच त्यांनी गावोगावी सभा घेऊन गावातील लोकांना व तरुण मुलांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून दयायला सुरवात केली. 
          'स्वराज्य  हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या मंत्राने त्यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या जनतेला जागे केले. त्यासाठी त्यांनी लोकांना शिक्षण दयायला सुरवात केली तसेच परदेशी मालावर बहिष्कार टाकला व स्वदेशी मालाचा पुरस्कार करायला सुरवात केली. लोकांनी एकत्र यावे व स्वातंत्र्याचे महत्व पटावे यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व छत्रपती शिवाजीमहाराज जयंती साजरी करायला सुरवात केली. ते इंग्रज सरकार विरोधात जहाल बोलत असत तसेच त्यांचे लेखनही जहाल होते. लोकशिक्षणासाठी त्यांनी 'केसरी' व 'मराठा' हि वर्तमानपत्रे चालू केली. 
          या वर्तमानपत्रातून ते इंग्रज सरकार विरोधात जहाल लेखन करू लागले. त्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगवासही भोगावा लागला. आपल्या जहाल देशप्रेमी विचारांनी त्यांनी सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षे मंडाले येथे तुरुंगात खितपत पडावे लागले. या काळातही त्यांनी लेखन सोडले नाही. या तुरुंगवासातही त्यांनी लोकांना समजेल असा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. 
          त्यांच्या जहाल वक्तव्यामुळे व लेखणीमुळे त्यांनी भारतीय लोकांच्या असंतोषाला वाचा फोडून इंग्रज सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ उभारली म्हणूनच त्यांना 'राजकीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असत. त्यांनी आपले सारे जीवन स्वातंत्र्यासाठी व जनतेच्या उद्धारासाठी घालवले. म्हणून लोकांनी त्यांना सन्मानाने 'लोकमान्य' हि पदवी दिली. 
               होमरूल लीग चळवळीत भाग, विलायतचा प्रवास व जनजागृतीसाठी देशभर प्रवास या दगदगीने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. त्यांची प्रकृती खालावत चालली. शेवटपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढत असताना त्यांना १९२० साली मृत्यूने कवटाळले.














 












 

























 












 

Friday, May 10, 2019

अवीट गोडीचे गाणे -- बाहों में चले आओ


अवीट गोडीचे गाणे -- बाहों में चले आओ

          अनामिका हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्देशक रघुनाथ झालानी होते व निर्माता ताहीर हुसेन होते. या चित्रपटात संजीव कुमार व जया भादुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील सर्व गीते मजरुह सुलतानपुरी यांनी  लिहिली होती तर संगीत राहुल देव बर्मन यांनी दिले होते. या चित्रपटातील गीते किशोर कुमार, आशा भोसले व लता मंगेशकर यांनी गायली आहेत. 'मेरी मेरी भिगी भिगी सी' हे गीत बिनाका गीतमाला १९७३ च्या कार्यक्रमात ४ थ्या नंबरवर होते तर 'बाहों में चले आओ' हे गीत बिनाका गीतमाला १९७३ च्या कार्यक्रमात ३६ व्या नंबरवर होते. 
           बाहों में चले आओ हे गीत लता मंगेशकर यांनी गायले असून राहुल देव बर्मन यांनी संगीत दिले आहे. संजीव कुमार व जया भादुरी यांच्यावर हे गीत चित्रीत झाले आहे.  

बाहों में चले आओ
बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा
ये आज का नहीं मिलन
ये संग है उम्र भर का
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा

चले ही जाना है
नज़र चुराके यूँ
फिर थामी थी साजन तुमने
मेरी कलाई क्यों
चले ही जाना है
नज़र चुराके यूँ
फिर थामी थी साजन तुमने
मेरी कलाई क्यों
किसी को अपना बना के छोड़
दे
ऐसा कोई नहीं करता
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा

कभी कभी कुछ तो
कहो पिया हमसे
के कम-से-कम आज तो खुलके
मिलो ज़रा हमसे
कभी कभी कुछ तो
कहो पिया हमसे
के कम-से-कम आज तो खुलके
मिलो ज़रा हमसे
है रात अपनी
जो तुम हो अपने
किसी का फिर हमें डर
क्या
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा
ये आज का नहीं मिलन
ये संग है उम्र भर का
श, श, श, श

बाहों में चले आओ
हो, हमसे सनम क्या परदा
ओ, हमसे सनम क्या परदा










कथा विवेकानंदांची -- भाषणातील एकाग्रता




कथा विवेकानंदांची -- भाषणातील एकाग्रता 

          हि गोष्ट आहे नरेंद्र जेव्हा स्वामी विवेकानंद बनून अमेरिकेला गेले होते तेव्हाची. अमेरिकेच्या पश्चिम भागातील एका गावी व्याख्यान देताना विवेकानंद म्हणाले कि, "ज्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे तो सदा-सर्वकाळ शांत आणि  अविचलित राहतो. बाहेरच्या जगातील कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकत नाही."
          त्या व्याख्यानाला आलेल्या काही गुराखी पोरांनी त्यांचे हे म्हणणे ऐकले होते. म्हणून स्वामीजी जेव्हा त्यांच्या गावी व्याख्यानाला आले तेव्हा याबाबतीत त्यांची परीक्षा घेण्याचे त्या पोरांनी ठरवले. व्याख्यानासाठी स्वामीजींना एका पालथ्या टाकलेल्या टबावर उभे केले. व्याख्यान सुरु झाले आणि थोडयाच वेळात स्वामीजी त्या विषयाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेले. त्यावेळी या गुराखी पोरांनी मागून बंदुकीच्या गोळ्या झाडण्यास सुरवात केली. स्वामीजींच्या कानाजवळून त्या गोळ्या सूं सूं करीत जात होत्या, पण स्वामीजींना त्याचे भानही नव्हते. ते पूर्णपणे एकाग्र होऊन भाषण करीत होते. 
          जेव्हा व्याख्यान संपले आणि स्वामीजी खाली बसले, तेव्हा खजील होऊन ती पोरे पुढे आली आणि स्वामीजींची क्षमा मागून त्यांना म्हणाली, "आपण फार थोर आहात. आपण जे तोंडाने सांगता ते आचरणातही आणता."












 












 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...