कालिया -- घणाघाती संवादाचा नजराणा
हा चित्रपट २५ डिसेंबर १९८१ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते इकबाल सिंग असून टिनू आनंदने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा इंदर राज आनंद व टिनू आनंद यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून राहुल देव बर्मन यांनी संगीतबध्द केली आहेत. आशा भोसले, किशोर कुमार, मोहमद रफी यांनी स्वरबद्ध केली आहेत.
अमिताभ बच्चन, आशा पारेख, परवीन बॉबी, कादर खान, अमजद खान, प्राण यांच्या मुख्य भुमिका आहेत. ह्या एकमेव चित्रपटात अमिताभ आणि आशा पारेख यांनी एकत्र काम केले.
अमिताभच्या 'अँग्री यंग मॅन' च्या पठडीतला हा आणखी एक चित्रपट. या चित्रपटामुळे अमिताभला 'सुपरस्टार' बिरुदावली चिटकवली गेली. या चित्रपटातील 'जहाँ तेरी ये नजर है' हे गाणे लोकप्रिय झाले व त्याकाळात पार्टी व नाईट क्लब मध्ये वाजवले गेले. किशोर कुमार व आशा भोसले यांनी गायलेले व अमिताभ व परवीन बॉबीवर या चित्रपटात अमिताभ व प्राणची जुगलबंदी दाखवली आहे. अमिताभ पहिल्यांदा साधाभोळा दाखवला आहे तेव्हा तो कल्लू असतो व अपराधी दुनियेत जातो तेव्हा कालिया बनतो. प्राण जेलरच्या भूमिकेत दाखवला आहे.
थोडक्यात कथानक
कल्लू ( अमिताभ बच्चन ) त्याचा मोठा भाऊ शामू ( कादर खान ), वहिनी शांती ( आशा पारेख ) आणि त्यांची धाकटी मुलगी मुन्नी यांच्यासोबत राहतो. तो आपला वेळ शेजारच्या मुलांसोबत खेळण्यात घालवतो. त्याचा मोठा भाऊ गिरणीत काम करताना हात गमावतो. त्याची नोकरी जाते आणि आता त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे. कालिया भावाच्या बॉसजवळ म्हणजेच सहानी सेठजवळ ( अमजद खान ) भावाच्या उपचारासाठी पैशाची भीक मागतो , पण तो नकार देतो. पैसे मिळवण्यासाठी कालिया सहानीच्या तिजोरीत शिरतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि उपचाराअभावी भाऊ मरण पावतो. सहानी चोरीच्या गुन्ह्यासाठी कालियाला तुरुंगात पाठवतो. तेथे त्याला नऊ महिन्यांची शिक्षा झाली आहे. इथेच त्याला गुन्हेगारीच्या जगात नेणारे पुरुष भेटतात. जेल मधून सुटल्यानंतर कल्लूचा कालिया झालेला असतो.
तो आणि त्याचे साथीदार गिरणीच्या मालकाने तस्करीसाठी ठेवलेले सोने चोरतात. त्यानंतर भावाच्या मृत्यूचा बदला म्हणून तो गिरणी जाळतो. त्याला पुन्हा दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवले जाते. त्याचे साथीदार त्याच्या वहिनीला पैसे देतात व खोटे बोलतात की तो तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी अमेरिकेत खूप पैसे कमवत आहे. ते गरीबाकडून श्रीमंताकडे जातात. तुरुंगात, कालिया जेलर ( प्राण ) ला भेटतो, ज्याची मुलगी लहान असताना एका कैद्याने तिचे अपहरण केले होते. कालिया तुरुंगातून सुटल्यानंतर, तो बदला घेण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी एका महिलेला भेटतो ( परवीन बाबी) सह एकत्रित केले आहे. मिल मालक आता कालियाच्या भाचीचे अपहरण करतो आणि तिच्या आईला खुनाच्या खटल्यात कालियाविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडतो. त्याने न केलेल्या हत्येसाठी तो दोषी आढळतो आणि आपल्या भाचीला शोधण्यासाठी तुरुंगातून पळून जातो. सुरुवातीला, वॉर्डन कालियाच्या मागे जातो आणि जेव्हा त्याला त्याची खरी कहाणी कळते, तेव्हा तो त्याला मदत करण्याचा निर्णय घेतो. ते गिरणी मालकाच्या जागी जातात आणि त्यांना कळते की त्या चिमुरडीबरोबरच भाभीचाही मृत्यू होणार आहे. कालिया गुंडांबरोबर हाणामारी करतो आणि लहान मुलीला व भाभीला गुंडांच्या तावडीतून सोडवितात.
अमिताभचा जेलमधील सुपरहिट सीन --
जेलमध्ये जेवण घेण्यासाठी कैद्यांची एक लाईन असते. कैदी नंबरप्रमाणे आपापले जेवण घेत असतात. त्यातीलच एक कैदी (प्यारेलाल) जेवण घेत असतो तेवढयात बॉब केष्टो येतो व म्हणतो, 'जीस थाली में हाथ रखा है, ओ थाली मेरी है', प्यारेलाल म्हणतो, 'तुम्हारी कैसी होगी, तुम तो लाइनमेही नही हो', बॉब केष्टो म्हणतो, 'हम जहाँ खडे होते है लाईन वहींसें सुरु होती है' असे म्हणून इतर कैदयांकडे बघतो. कैदी गुपचूप बॉब केष्टोच्या मागे येऊन उभे राहतात. बॉब केष्टो प्यारेलालला ढकलून देतो व दुसऱ्या कैद्याच्या हातातील थाळी हिसकावून घेतो तेवढयात अमिताभ येतो व बॉब केष्टोच्या हातातील थाळी घेतो व म्हणतो, ' इस थाली पे तुम्हारा नाम नही, हमारा नाम लिखा है', बॉब केष्टो अमिताभला विचारतो, 'कौन हो तुम ?', अमिताभ त्याला म्हणतो, 'हमी भी ओ है, कभी किसीके पीछे खडे नहीं होते, जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है' नंतर दोघांमध्ये मारामारी होते. हा प्रसंग व यातील 'जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है' हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला.
अमिताभचे दमदार संवाद --
अमिताभचा सिनेमा म्हणलं कि त्यात दमदार संवाद आलेच. अमिताभच्या चित्रपटात संवाद नसेल तर तो चित्रपट कसला. संवादाविना अमिताभचे चित्रपट अपुरेच आहेत. अमिताभच्या चित्रपटात संवादाची खमंग फोडणी हवीच, ती या चित्रपटातही होती. अमिताभचे खमंग व दमदार संवाद पुढीलप्रमाणे
१) 'हमी भी ओ है, कभी किसीके पीछे खडे नहीं होते, जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है'
२) आप ने जेल कि दिवारों और जंजिरो का लोहा देखा है जेलर साहब ... कालिया कि हिम्मत का फौलाद नही देखा
३) ये सर किसी इन्सान के सामने नही झुक सकता जेलरसाब... झुकेगा तो उसकी चौकट पे... या उसकी दरबार मे झुकेगा
४) तुम्हारा बाप सहानी कहाँ है... बीताओ वरना गोली चल गयी तो... सारा आता पता पूछ कर वापस आ जायेगी
५) दुनिया से मुझे कुछ हिसाब चुकाने है... एक बार चूक जाये उसके बाद आराम हि आराम है
अमिताभचा जेलमधील सुपरहिट सीन -- हम जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है
No comments:
Post a Comment