तुकाराम महाराज अभंग-परिमळ म्हणू चोळू नये फूल ।
परिमळ म्हणू चोळू नये फूल । खाऊ नये मूल आवडते ।। १ ।।
मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद । यंत्र भेदूनी नाद पाहूं नये ।। २ ।।
कर्मफळ म्हणूनि इच्छू नये काम । तुका म्हणे वर्म दावू लोकां ।। ३ ।।
तुकाराम महाराजांनी या अभंगात असे सांगितले आहे कि, 'आपण जे जे कर्म करणार आहोत ते फळ मिळवून देणारीच आहेत. पण त्या फळाची अपेक्षा न करता (कामेच्छा न धरता) कर्म करत रहावे.' तुकाराम महाराज या अभंगातून असे म्हणत आहेत कि, 'पुष्प हे सुगंधी आहे म्हणून त्याला हाताने चोळू नये. आपले मूल फार आवडते म्हणून खाऊ नये. मोत्याचे ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा स्वाद चाखून पाहू नये. भांडयावर भांडी आपटून त्याचा नाद ऐकू नये.'
तुकाराम महाराजांना या अभंगातून असे सांगायचे आहे कि, फुल सुवासिक असले तरी ते जर हाताने चोळले तर त्याचा सुवासिकपणा संपून ते टाकून दयावे लागते. फुल जोपर्यंत चांगले आहे तोपर्यंत त्याचा सुवासिकपणा टिकून राहतो पण तेच फुल हाताने चोळले तर त्याचा सुवासिकपणा संपून ते टाकून दयावे लागते. म्हणजेच सुवासिकपणा हा फुलाचा सद्गुण तर हाताने फुल चोळणे म्हणजे दुर्गुण. आई वडील आपल्या मुलाचे प्रेमापोटी लाड करतात . हट्टापायी मागितलेली वस्तू लगेच देतात. नंतर तोच मुलगा मोठा झाल्यावर आई वडिलांना विसरतो, त्यांना लाथा मारायला कमी करत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, आपले मुल आवडत असले तरी त्याचा लाड करू नये (खाऊ नये). मोत्याचे ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा स्वाद घेऊ नये म्हणजेच मोती समुद्राच्या पाण्यात सापडतात व समुद्राचे पाणी खारट लागते. पाणी खारट असल्याने पाणी पिववत नाही व या पाण्याने माणसाची तहान भागत नाही. पाणी असूनही पाणी पिता येत नाही हा समुद्राचा दुर्गुण होय. भांडयावर भांडी आपटून त्याचा नाद ऐकू नये म्हणजे घरात कडाक्याचे भांडण चालले असेल तर ते ऐकू नये कारण त्या भांडणात द्वेष, मत्सर, अपशब्द, शिव्या शाप, असे दुर्गुण भरलेले असतात. या दुर्गुणांमुळे सुख प्राप्त न होता दुःखच होते.
No comments:
Post a Comment