दीवार -- दोन भावातील संघर्ष
"आज मेरे पास बंगला है, गाडी है, बॅलन्स है, तुम्हारे पास क्या है ?", "मेरे पास माँ है ।" हे संवाद कानावर ऐकू पडले कि हमखास आठवण येते अमिताभ बच्चन यांच्या दीवार या चित्रपटाची. १९७५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता होते गुलशन राय तर दिग्दर्शक होते यश चोपडा. या चित्रपटाची कथा पटकथा सलीम जावेद यांनी लिहिली. या चित्रपटातील गाणी साहिर लुधियानवी यांनी लिहिली असून राहुल देव बर्मन यांनी संगीत दिले आहे. आशा भोसले, मन्ना डे, किशोर कुमार, उषा मंगेशकर, भूपेंद्र सिंह, उर्सुला वाज यांनी गाणी गायली आहेत.
या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशी कपूर, निरुपा रॉय, परवीन बॉबी, नीतू सिंह, इफ्तेकार, मदन पुरी यांच्या मुख्य भुमिका आहेत.
हा चित्रपट दोन भावांच्या (अमिताभ बच्चन व शशी कपूर) संघर्षावर आधारित आहे. लहानपणी झालेल्या अत्याचारामुळे दोन भाऊ वेगवेगळे मार्ग निवडतात. एक मार्ग असतो सत्याचा तो शशी कपूर निवडतो म्हणजेच तो पोलीस इन्स्पेक्टर बनतो तर एक मार्ग असतो असत्याचा तो अमिताभ बच्चन निवडतो म्हणजेच चोऱ्या, स्मगलिंग करतो. शशी कपूर सत्याच्या मार्गावर चालूनही साधाच राहतो तर अमिताभ बच्चन असत्याच्या मार्गावर चालून पैसा, गाडी, बंगला कमावतो. सत्य व असत्य यांची भिंत (दीवार) दोघांमध्ये उभी राहते असे या चित्रपटात दाखवले आहे. अमिताभने विजय वर्मा पुर्ण ताकतीने उभा केला आहे. या भुमिकेमुळे त्याला 'अँग्री यंग मॅन' चा 'किताब दिला गेला.
अमिताभच्या आवाजातील संवादही प्रचंड गाजले. दीवार चित्रपटाचे नाव काढले कि आजही त्यांचे तोंडून बाहेर पडलेले संवाद आठवतात.
१) मेरा बाप चोर है
२) आज मेरे पास बंगला है, गाडी है, बॅलन्स है, तुम्हारे पास क्या है?
३) ये चाबी अपनी जेब में रख लें पीटर, अब ये ताला मैं तेरी जेबसे चाबी निकालकर हि खोलुंगा ।
४) "पीटर तुम मुझे वहाँ ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतज़ार कर रहा हूँ."
५) "मैं आज भी फैंके हुए पैसे नहीं उठाता"
हे डायलॉग ऐकण्यासाठी व अमिताभची भुमिका बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत होते. उत्कृष्ठ अभिनयामुळे अमिताभला फिल्म फेअरतर्फे दिले जाणारे 'बेस्ट ऍक्टर' चे नामांकन मिळाले.
No comments:
Post a Comment