Sunday, April 11, 2021

शान - शोलेची दुसरी आवृत्ती

 

 शान - शोलेची दुसरी आवृत्ती

          हा चित्रपट १२ डिसेंबर १९८० रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते जी पी सिप्पी होते तर दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. या चित्रपटाची कथा सलीम जावेद यांनी लिहिली. या चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांचे होते तर आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली आहेत. किशोर कुमार, मोहमद रफी, आशा भोसले, उषा मंगेशकर आर डी बर्मन (यम्मा यम्मा), उषा ऊथुप (दोस्तो सें प्यार किया - टायटल सॉंग) यांनी गाणी गायली आहेत. 

          या चित्रपटात सुनील दत्त, राखी, अमिताभ बच्चन, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, परवीन बॉबी, बिंदिया गोस्वामी, कुलभूषण खरवंदा, जॉनी वॉकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. कुलभूषण खरवंदाची टकलू शाकालची  भूमिका प्रचंड गाजली. अमिताभने व शशी कपूरने भुरटया चोराची भूमिका केली आहे. 

          या चित्रपटात अमिताभने सुनील दत्तच्या भावाची भुमिका केली आहे. सुनील दत्त एक प्रामाणिक व बहादूर पोलीस अधिकारी असतो. तो शाकालचे काळे धंदे संपवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तो शाकालकडून मारला जातो. अमिताभ बच्चन व शशी कपूर शत्रुघ्न सिन्हाच्या मदतीने शाकालशी लढून आपल्या भावाचा बदला घेतो व शाकालचे साम्राज्य उद्वस्थ करतो असे या चित्रपटात दाखवले आहे. अमिताभची नायिका परवीन बॉबी आहे तर शशी कपूरची नायिका बिंदिया गोस्वामी आहे. 

          परवीन बॉबीची प्रतीक्षा करीत एका हॉटेलमध्ये बसलेला अमिताभ एका अनोळखी स्त्रीबरोबर वेळ घालवण्यासाठी गप्पा मारता मारता त्यांच्या भविष्यातील फॅमिली प्लॅनिंगपर्यंत पोचतो हा विनोदी प्रसंग आहे. अमिताभ बच्चन, शशी कपूर, परवीन बॉबी, बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेले 'यम्मा, यम्मा' हे गाणे ८० सालातील प्रचंड लोकप्रिय गाणे होते. शेवटी अमिताभ बच्चन मगरीबरोबर फायटिंग करतो तो सीन थरारक व श्वास रोखून धरायला लावणारा होता. 

          या चित्रपटाची तुलना शोले बरोबर केली गेली तसेच शाकालचा भव्यदिव्य सेट, अमिताभची हलकीफुलकी विनोदी भुमीका व त्याचे फायटिंग सीन यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत होते. रमेश सिप्पी यांचा शोले नंतरचा हा प्रचंड गाजलेला दुसरा सिनेमा होता.

 














          












No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...