कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन
प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना
होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या
विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा
सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी
लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल औषधे अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध
नाहीत.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे
उपचार
- या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.
- दृष्टोत्पत्तीस आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात.
- गंभीर अवस्थेत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.
२०१९-२०२० वूहान कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक
२०१९मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे आहे.१३ मार्च २०२० अखेर जगात १,३२,७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. चीनमधील हूबै प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. हूबै प्रांतातील वूहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३ मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला असून ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे.
६ एप्रिल २०२० अखेर जगात एकूण १२,१०,९५६ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ६७,५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी युरोपीय देशांत ४९,४७९ तर अमेरिकेत ९,६८० मृत्यू झाले आहेत.
कोरोना व्हायरसपासून (COVID-19) कशी काळजी घ्यायची
- स्वच्छ हात धुवा.
- हातरुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा.
- तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका.
- कमीत कमी तीन फुटाचे अंतर.
- आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश.
कोरोना आणि लॉकडाऊन
चीन देशातील वुहान या शहरातून कोरोना या विषाणूची लागण झाली आणि संपूर्ण जगभर पसरली. या संपूर्ण जग हादरून गेले. या विषाणूने भारतातही हातपाय पसरायला सुरवात केली. हा आकडा हळूहळू हजाराच्यावर जायला लागला आहे. ह्या रोगावर सध्यातरी औषध नाही. त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे.
कोरोना व्हायरसची लागण एकमेकांच्या संपर्कात आल्याने होते हे समजल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी, २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयं-लादलेले 'कर्फ्यू' पाळण्याची भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली. भारतातील कोरोनाव्हायरस रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत व्हावी, हा यामागचा उद्देश होता. २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत येते २१ दिवस 'पूर्ण-लॉक-डाउन' राहील.
या लॉकडाऊनच्या काळात कोणीही कोणाच्या संपर्कात येऊ नये यासाठी कोणीही घराबाहेर पडायचे नाही अशी सक्ती करण्यात आली. कार्यालयात ५० टक्के कर्मचारीच उपस्थित राहावेत बाकीच्यांनी घरी बसून कार्यालयीन कामकाज (work from home) करावे असा आदेश काढण्यात आला. जीवनावश्यक सेवांना जसे कि मेडिकल दुकान, किराणा दुकान, दुध डेअरी, भाजीपाला, बँका यांना परवानगी देण्यात आली. दवाखाने चालू ठेवायला सांगितले. "कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, बाहेर पडायचेच असेल तर तोंडाला मास्क लावून बाहेर पडावे" असे आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आवाहन करत आहेत.
लॉकडाऊनचा समाज जीवनावर परिणाम
लॉकडाऊनमूळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांची अवस्था घरात कोंडल्यासारखी झाली आहे. लहान मोठे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, लहानमोठे उद्योगधंदे बंद असल्याने संपूर्ण चलन थांबले आहे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे अशावेळी हे कामगार मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत आहेत. लॉकडाऊनमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रेल्वे, एसटी बस बंद असल्याने लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण प्रवास थांबला आहे परिणामी रेल्वे, एसटी बसला याचा फटका बसला आहे. लहानमोठे व्यावसायिक यांचे बरेच नुकसान झाले आहे. आपल्या देशाची आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. यातून आपण लवकरच सावरू व कोरोना सारख्या भयंकर विषाणूला आपण हद्दपार करू अशी देवाजवळ प्रार्थना करू.
No comments:
Post a Comment