Friday, April 10, 2020

अवीट गोडीचे गाणे -- फिटे अंधाराचे जाळे


                           


                   अवीट गोडीचे गाणे -- फिटे अंधाराचे जाळे 

                     
               हे अवीट गोडीचे गाणे आहे 'लक्ष्मीची पाऊले" या चित्रपटातील. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेला हा पहिला चित्रपट. बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं हे गीत श्रीधर फडके यांनी संगीतबध्द केले आहे. बाबूजींनी श्रीधरजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेलं हे पहिलं गीत. 
               रवींद्र महाजनी व रंजना यांच्यावर हे गीत चित्रित झाले आहे. दोघांच्या उत्कट अभिनयाने आणि सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या सुस्वर आवाजाने हे गीत अजरामर झाले आहे.
 फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
 दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश ।। धृ ।।

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास ।। १ ।।
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास ।। २ ।।

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास ।। ३ ।।

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...