Monday, April 13, 2020

गोष्ट -- श्रमाशिवाय दुसरे सुख नाही



गोष्ट -- श्रमाशिवाय दुसरे सुख नाही 

          एक आटपाट नगर होतं.  या नगरीतील  प्रजा खाऊन पिऊन सुखी होती. राजाला  प्रजेची किंवा शत्रूची धास्ती नव्हती. खाणे, पिणे आणि संगीत ऐकणे  एवढेच काम राजाला  होते. एकूण राजाचे आयुष्य मौज मजेत चालले होते. एके दिवशी राजा आजारी पडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना कि सुखाची झोप येईना. लगेच राजावर उपचार  चालू झाले. बरेच हकीम, वैद्य यांना बोलावून त्यांचे औषधपाणी चालू केले. परंतु त्यांच्या औषधांचा गुण काही राजाला आला नाही. शेवटी जो कोणी राजाला बरे करेल त्याला बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले. 
          हि दवंडी ऐकून बऱ्याच जणांनी राजाला बरे करण्याचे प्रयत्न केले. परंतु कुणालाही यश आले नाही. एके दिवशी एक वृध्द गृहस्थ गावात आला असता त्याच्या कानावर हि दवंडी पडली. मग तो राजाकडे गेला व राजाला म्हणाला, "महाराज, मी तुम्हाला बरे करतो, पण माझे तुम्हाला ऐकावे लागेल. हे ऐकून राजा आनंदित झाला व तो इसम सांगेल तसे करण्यास राजा तयार झाला. 
          दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दोघेही माळरानावर गेले. वृध्द गृहस्थाने राजाच्या हाती कुदळ दिली व राजाला एक मोठी विहीर  खोदायला सांगितले. राजाने विहीर खोदायला सुरवात केली. दिवसभर विहीर खोदून राजाला  दमायला व्हायचे. दिवसभर श्रम केल्यामुळे राजाला रात्री सटकून भूक लागायची  त्यामुळे त्याला जेवण जायला लागले. तसेच शारीरिक कष्ट केल्यामुळे रात्री व्यवस्थित झोपही मिळायला लागली. त्यामुळे राजाचा आजार कुठल्याकुठे पळाला व राजा ताजातवाना दिसू लागला. शारिरीक कष्ट केल्यामुळे आरोग्य उत्तम राहते हे राजाला कळून चुकले. आपला आजार बरा केल्याबद्दल त्याने वृध्द गृहस्थाला योग्य बक्षीस दिले. 















Sunday, April 12, 2020

अवीट गोडीचे गाणे -- हम दोनो दो प्रेमी

 
 
राजेश खन्ना व झीनत अमान  
 अवीट गोडीचे गाणे -- हम दोनो दो प्रेमी 
 
          हे अवीट गोडीचे गाणे "अजनबी" या चित्रपटातील आहे. हा चित्रपट 
१८ सप्टेंबर १९७४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते शक्ती 
सामंता.राजेश खन्ना व झीनत अमान हे मुख्य भूमिकेत होते. प्रेम चोप्रा, 
मदन पुरी,असरानी, योगिता बाली यांनीही या चित्रपटात भूमिका केली. या 
चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून या गाण्यांना संगीत आर. 
डी. बर्मन यांनी दिले आहे. या चित्रपटातील गीते किशोर कुमार, लता 
मंगेशकर व आशा भोसले यांनी गायली आहेत. "एक अजनबी हसीना से" हे 
गीत किशोर कुमार बरोबर राजेश खन्ना यांनीही गायले आहे. 
          "हम दोनो दो प्रेमी" हे गीत राजेश खन्ना व झीनत अमान 
यांच्यावर चित्रित झाले आहे. हे पहिले गीत असे आहे कि रेल्वेवर चित्रित झाले 
आहे. राजेश खन्ना व झीनत अमान जेव्हा पळून जातात तेव्हा त्यांच्या तोंडी 
हे गीत येते. ह्या गीताला आर. डी. बर्मन यांचे संगीत लाभले आहे तर 
किशोर-लता यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. आनंद बक्षी 
यांनी हे गीत लिहिले आहे. हे गीत अजूनही ऐकायला गोड वाटते.    
 
 
हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड़ चले
जीवन की हम सारी रस्मे तोड़ चले
बाबूल की आए मोहे याद
जाने क्या हो अब इस के बाद

गाड़ी से कह दो चले तेज मंज़िल है दूर 
थोड़ा सफ़र का मज़ा लिजिए, ऐ हुजूर
देखो ना छेड़ो इस तरह, रस्ता कटे फिर किस तरह

जाना कहाँ है बता उस शहर का नाम
ले चल जहाँ तेरी मर्ज़ी, ये तेरा है काम
मुझ पे है इतना ऐतबार, मैने किया है तुम से प्यार

ऐसा न हो तू कभी छोड़ दे मेरा साथ
फिर न कभी कहना दिल तोड़नेवाली बात
मैने तो की थी दिल्लगी, मैने भी की थी दिल्लगी
 
चित्रपट / Film: अजनबी
संगीतकार / Music Director: राहुलदेव बर्मन
गीतकार / Lyricist: आनंद बक्षी
गायक / Singer(s): किशोर कुमारलता मंगेशकर 

Friday, April 10, 2020

अवीट गोडीचे गाणे -- फिटे अंधाराचे जाळे


                           


                   अवीट गोडीचे गाणे -- फिटे अंधाराचे जाळे 

                     
               हे अवीट गोडीचे गाणे आहे 'लक्ष्मीची पाऊले" या चित्रपटातील. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेला हा पहिला चित्रपट. बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं हे गीत श्रीधर फडके यांनी संगीतबध्द केले आहे. बाबूजींनी श्रीधरजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेलं हे पहिलं गीत. 
               रवींद्र महाजनी व रंजना यांच्यावर हे गीत चित्रित झाले आहे. दोघांच्या उत्कट अभिनयाने आणि सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या सुस्वर आवाजाने हे गीत अजरामर झाले आहे.
 फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
 दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश ।। धृ ।।

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास ।। १ ।।
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास ।। २ ।।

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास ।। ३ ।।

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

कोरोना(COVID-19) आणि लॉकडाऊन



कोरोना(COVID-19) आणि लॉकडाऊन 

               कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल औषधे अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध नाहीत. 

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे
               कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना, अनुनासिक रक्तसंचय, वाहणारे नाक, घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत नाही.बहुतेक लोक (सुमारे ८०%) विशेष उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना होणार्‍या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.[५]

उपचार

  1. या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.
  2. दृष्टोत्पत्तीस आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात.
  3. गंभीर अवस्थेत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.

२०१९-२०२० वूहान कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक

               २०१९मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे आहे.
               १३ मार्च २०२० अखेर जगात १,३२,७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. चीनमधील हूबै प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. हूबै प्रांतातील वूहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३ मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला असून ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे.
               ६ एप्रिल २०२० अखेर जगात एकूण १२,१०,९५६ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ६७,५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी युरोपीय देशांत ४९,४७९ तर अमेरिकेत ९,६८० मृत्यू झाले आहेत.

कोरोना व्हायरसपासून (COVID-19) कशी काळजी घ्यायची

  • स्वच्छ हात धुवा.
पाणी आणि साबणाने ४० सेकंद हात धुवा. जर तुम्ही अल्कोहोल असणारे हॅंड वाॅश वापरत असाल तर २० सेकंद पुरेसे आहेत. जर तुमचा हात अस्वच्छ असेल किंवा मातीमुळे खराब झाला असेल तर साबण आणि पाण्याचाच वापर करा.

खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवा. रुमाल नसेल तर टिश्यू पेपरचा वापर करा. अन्यथा हाताच्या कोपराने तोंड झाका. टिश्यू पेपरचा वापर केल्यावर तो तात्काळ बंद कचरापेटीत फेकून द्या.

  • तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका.
कोरोना वायरस लोकांच्या थुंकीतून एखाद्या पृष्ठभागावर पडू शकतो. नकळत आपला हात त्या पृष्ठभागाला लागू शकतो. त्यामुळे तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका.

  • कमीत कमी तीन फुटाचे अंतर.
समोरच्या व्यक्ती सोबत बोलत असताना त्याच्यापासून कमीत कमी तीन फुटाचे अंतर ठेवा.हगफ्टरत 

  • आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश.
कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे.यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. 
 

  कोरोना आणि लॉकडाऊन  
               चीन  देशातील वुहान या शहरातून कोरोना या विषाणूची लागण झाली आणि संपूर्ण जगभर पसरली. या  संपूर्ण जग हादरून गेले. या विषाणूने भारतातही हातपाय  पसरायला सुरवात केली. हा आकडा हळूहळू हजाराच्यावर जायला लागला आहे. ह्या रोगावर  सध्यातरी औषध नाही. त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. 
               कोरोना व्हायरसची लागण एकमेकांच्या संपर्कात आल्याने होते  हे समजल्यावर पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी रविवारी, २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयं-लादलेले 'कर्फ्यू' पाळण्याची भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली. भारतातील कोरोनाव्हायरस रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत व्हावी, हा यामागचा उद्देश होता. २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत येते २१ दिवस 'पूर्ण-लॉक-डाउन' राहील.
               या लॉकडाऊनच्या काळात कोणीही कोणाच्या संपर्कात येऊ नये यासाठी कोणीही घराबाहेर पडायचे नाही अशी सक्ती करण्यात आली. कार्यालयात ५० टक्के कर्मचारीच उपस्थित राहावेत बाकीच्यांनी घरी बसून कार्यालयीन कामकाज (work from home) करावे असा आदेश काढण्यात आला. जीवनावश्यक सेवांना जसे कि मेडिकल दुकान, किराणा दुकान, दुध डेअरी, भाजीपाला, बँका यांना परवानगी देण्यात आली. दवाखाने चालू ठेवायला सांगितले. "कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, बाहेर पडायचेच असेल तर तोंडाला मास्क लावून बाहेर पडावे" असे  आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आवाहन करत आहेत. 
लॉकडाऊनचा समाज जीवनावर परिणाम 
               लॉकडाऊनमूळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांची अवस्था घरात कोंडल्यासारखी झाली आहे. लहान मोठे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, लहानमोठे उद्योगधंदे बंद असल्याने संपूर्ण चलन थांबले आहे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे अशावेळी हे कामगार मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत आहेत. लॉकडाऊनमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रेल्वे, एसटी बस बंद असल्याने लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण प्रवास थांबला आहे परिणामी रेल्वे, एसटी बसला याचा फटका बसला आहे. लहानमोठे व्यावसायिक यांचे बरेच नुकसान झाले आहे. आपल्या देशाची आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. यातून आपण लवकरच सावरू व कोरोना सारख्या भयंकर विषाणूला आपण हद्दपार करू अशी देवाजवळ प्रार्थना करू.
               
             












 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...