Sunday, November 3, 2019

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ३ व ४)


तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ३ व ४)

कोठें दिसे न पाहता । उडी घाली अवचिता ।। ३ ।।
सुख ठेवी आम्हासाठी । दुःख आपणचि घोटी ।। ४ ।।

अर्थ : एरवी तिला पाहू गेले; तर ती कोठेही दिसत नाही, पण भक्ताने हाका मारिल्याबरोबर अकस्मात उडी घालिते. आम्हा भक्तांकरिता सुख ठेविते व आमच्यावरचे दुःख आपणच गिळिते. 

भावार्थ : पांडुरंग हे असे दैवत आहे कि, एखादा भक्त संकटात सापडला असेल व तो मदतीसाठी पांडुरंगाची आराधना करत आहे, पांडुरंगाला आर्त हाक मारत आहे तर पांडुरंग त्याची हाक ऐकून लगेच धावून येतो व भक्ताला संकटातून सोडवतो. जो कोणी विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करेल, त्याचे नित्यनियमाने नामस्मरण घेईल, विठ्ठलाला भजेल त्यालाच विठ्ठल आपले दर्शन देईल. 
               सर्व संत मंडळी विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करत होते, त्याचे नित्यनियमाने नमःस्मरण घेत होते. त्यांच्यावर कितीही संकटे आली, दुःख, वेदना झाल्या तरीही त्यांची विठ्ठलावरील भक्ती तसूभरही कमी झाली नाही कि त्यांच्या भक्तीत कधी खंड पडला नाही. उलट त्यांची हि अंतःकरणापासून केलेली भक्ती पाहून विठ्ठलही भारावला. विठ्ठलाने या संतांना आपल्या हृदयात स्थान दिले. त्यांच्यावर कृपाछत्र धरले. अडचणीच्या वेळी त्यांच्या मदतीला धावून आला व त्यांना संकटातून सोडवले. विठ्ठलाने या संतमंडळींची सर्व दुःखे, वेदना स्वतः झेलल्या व त्यांना सुख प्राप्त करून दिले. 
               तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती केली तरच विठ्ठल भक्तांच्या मदतीला धावून येतो पण जर भक्तीच केली नाही तर विठ्ठल दर्शन देणार नाही म्हणजेच एरवी विठ्ठलाला नुसतेच पाहायचे म्हणले तर विठ्ठल दिसणार नाही कारण विठ्ठलाबद्दल तसा भक्तिभाव मनात असावा लागतो. विठ्ठल हा भक्तीभावाचा भुकेला आहे. 




























































 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...