सांगली संस्थानचा गणपती -- चोर गणपती
सांगलीत गणेश चतुर्थीच्या आधी संस्थानच्या गणपती मंदिरात लाकडी मूर्ती बसवली जाते. हाच चोर गणपती कारण हा केव्हा बसतो हेच कळत नाही. त्यानंतर गणेश चतुर्थीला सांगली संस्थानच्या उत्सवाला सुरवात होते.
सन १८९९ मध्ये राजवैदय सांभारे यांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. या उत्सवात व्याख्यान व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या गणेशाची मूर्ती सुरवातीला शाडूची बनवण्यात आली होती. तिची प्रतिष्ठापना चतुर्थीला व्हायची; पण मूर्ती भंगल्यामुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतर ११ फूट उंच व ७ फूट रुंदीची पांगिरा लाकडापासूनची मूर्ती बनवण्यात आली. आमराईतून ते लाकूड आणले गेले. या मूर्तीची स्थापना दशमीदिवशी झाली.
आधी चोर गणपती, नंतर संस्थानचा मुख्य गणपती, शेवटी सांभारेंचा गणपती अशी सांगलीच्या प्रतिष्ठापनेची परंपरा आहे. गजानन मिल गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने कर्मचारी व मुद्दाम तयार करून घेतलेल्या हत्तीसोबत मिरवणूक काढली जाते. दैवज्ञ ब्राह्मण समाजातही महिला पारंपरिक नऊवारी साडी नेसून, दागिने घालून गजाननाच्या पालखीचे स्वागत करतात. विजयंता मंडळाने लोककलेला प्राधान्य दिले.
पाचव्या दिवशी संस्थानच्या मिरवणुकीत लाकडी रथातून मिरवणूक निघते. ती दरबार हॉलमधून मुख्य रस्त्यावरून निघून गणपती मंदिरात येते. मंदिरातून सरकारी घाट येथे श्रींचे विसर्जन होते. मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक येतात.
No comments:
Post a Comment