अवीट गोडीचे गाणे -- सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
उंबरठा हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. हा चित्रपट शांता निसाळ यांच्या बेघर या कादंबरीवर आधारित आहे.या चित्रपटात स्मिता पाटील व गिरीश कर्नाड यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला १९८२ साली महाराष्ट्र राज्य सरकारचे बेस्ट फिल्म अवॉर्ड, जब्बार पटेल यांना बेस्ट डिरेक्टर अवॉर्ड, स्मिता पाटील यांना Best Actress अवॉर्ड तर National Film Award for Best Feature Film in Marathi असे पुरस्कार मिळाले.
या चित्रपटातील सर्वच गाणी सुरेल आहेत त्यातीलच 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' हे गीत. हे गीत सुरेश भट यांनी लिहिले आहे. या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले आहे. हे गीत लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. हे गीत स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झाले आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
No comments:
Post a Comment