ब्लॉगवरील लेखांचे 'शतक' पुर्ण केल्याबद्दल सांगली सकाळ मध्ये आलेली बातमी.
आनंद ब्लॉगवरील लेखांचे 'शतक' पुर्ण
सध्या इंटरनेटचा जमाना आहे. इंटरनेट म्हणजे माहितीचे भांडार, मायाजाल आहे. या मायाजालात कोण कसा अडकेल व या मायाजालाचा कोण कसा उपयोग करून घेईल हे सांगता येत नाही. याच मायाजालाचा मी आनंद ब्लॉग लिहून चांगला उपयोग करून घेतला आहे. माझ्या ब्लॉगवरील लेखनाने आता 'शंभरी' गाठली आहे.
माझे लेख वृत्तपत्रात येत असतात. या लेखांना वाचकवर्गही चांगला मिळत आहे परंतु माझे लेखन मर्यादित न राहता सर्वदूर पोचावे असे मला वाटू लागले. मग मी मार्ग निवडला इंटरनेटचा. इंटरनेटवर ब्लॉग वाचता वाचता मलाही इंटरनेटवर माझा ब्लॉग असावा असे वाटू लागले. मग मी Blogger.com वर जाऊन ANAND ब्लॉग चालू केला. मी आनंद अंक प्रकाशित करतो म्हणून याच नावाने ANAND ब्लॉग चालू केला.
या ब्लॉगवर कारगिल युद्ध भाग १,२,३, श्रीराम चरित्र व आपण - एक गुंफण, गणपतींची माहिती, सैराट झालं जी, पुस्तक हे आपले मित्र हे लेख,अवीट गोडीचे गाणे मध्ये हिंदी-मराठी चित्रपटातील सुमधुर गीते आहेत. तुकाराम महाराज गाथा-अभंगमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. त्याचबरोबर कथा, कविता, लेख आहेत. क्रिकेट विश्वचषक संदर्भात लेख आहेत. या ब्लॉगचे वैशिष्ठय म्हणजे या ब्लॉगवर व्हिडिओही अपलोड केले आहेत.
आनंद ब्लॉग भारताबरोबर युनायटेड स्टेट, इंडोनेशिया, बोलिव्हिया, जर्मनी, चीन, हॉंगकॉंग, आर्यलँड, युक्रेन या देशांमध्येही वाचला जातो. आनंद ब्लॉग मोबाईलवरही वाचता येतो. यासाठी http://myanandank.blogspot.com हि अक्षरे टाईप करावीत. माझा आता २०० ब्लॉग लिहिण्याचा मानस आहे.
No comments:
Post a Comment