Sunday, April 7, 2019

अवीट गोडीचे गाणे -- हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे


अवीट गोडीचे गाणे -- हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 

           हे गीत   'अशी हि बनवाबनवी ' या  चित्रपटातील आहे. हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा वसंत सबनीस यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गीते शांताराम नांदगावकर व सुधीर मोघे यांनी लिहिली असून अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीत दिले आहे.
         'हृदयी वसंत फुलताना' हे अवीट गोडीचे गीत सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी यांनी गायले असून अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीत दिले आहे. हे गीत सचिन पिळगावकर , सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, अश्विनी भावे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुशांत रे, निवेदिता जोशी यांच्यावर चित्रित झाले आहे.

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे .... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ।। धृ ।।

मोहुनीया ऐसी जाऊ नको,
रोखूनिया मजला पाहू नको,
मोहुनीया ऐसी जाऊ नको,
रोखूनिया मजला पाहू नको,
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे .... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ।। १ ।।

पाकळी पाकळी उमले,
प्रीत भरलेली हाय हाय... 
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली ...
पाकळी पाकळी उमले,
प्रीत भरलेली हाय हाय... 
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली ... 
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बांधाच्या हे अंतरंग न्हावे... 
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ... ।। २ ।।

मदभारा प्रीतीचा गंध हा 
दे गं मधुवंती हाय हाय... 
रंग तू सोड रे छंद हा तून मजसाठी... 
मदभारा प्रीतीचा गंध हा 
दे गं मधुवंती हाय हाय... 
रंग तू सोड रे छंद हा तून मजसाठी... 
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा.. 
हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा... 
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे..
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे .... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ।। ३ ।।



























No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...