Saturday, April 13, 2019

कथा विवेकानंदांची -- प्राणीमित्र नरेंद्र

 

कथा विवेकानंदांची -- प्राणीमित्र नरेंद्र 

          नरेंद्र लहान असताना विश्वनाथबाबूंनी त्याला अनेक खेळणी आणून दिली होती. या अजीव वस्तूंबरोबरच जिवंत पशुपक्ष्यांचा सहवास त्याला लाभावा म्हणून घराच्या अंगणातच त्यांनी एक छोटेसे प्राणिसंग्रहालयही केले होते. घरात गाई तर होत्याच. नरेंद्र आणि त्याचे मित्र या प्राणी-मित्रांशी खेळण्यात रमून जायचे. नरेंद्रला गाई अधिक आवडायच्या. तो फुलांच्या माळा करून गायींच्या गळ्यात घालायचा. त्यांची पूजा करायचा. 
          नरेंद्र थोडा मोठा झाल्यावर वडिलांनी त्याला एक घोडा आणून दिला. लहानपणीच नरेंद्र त्यावर बसायला शिकला. 
             पुढे एकदा हिमालयात यात्रा करीत असताना स्वामीजींच्या एका अमेरिकन शिष्याचा घोडा उधळला. स्वराला खाली पाडणार, तोच स्वामीजींनी घोडयाला धरले आणि मग शांत केले. नंतर काही वेळ ते स्वतः त्या घोडयावर बसले. थोडयावेळाने त्यांनी नुकत्याच घोडयावर बसायला शिकलेल्या एका शिष्याला सांगितले, "आता मी खाली उतरतो. तू बैस आता या घोडयावर."
          तो शिष्य घाबरला. स्वामीजी म्हणाले, "भिऊ नकोस, तो आता काही करणार नाही. साधूच्या सहवासात आलेले प्राणीही साधू-वृत्तीचे होतात. ते कोणाला त्रास देत नाहीत." आणि खरोखर तसे घडले. पुढच्या प्रवासात त्या घोडयाने जराही त्रास दिला नाही.












  












 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...