भारतीय संघाचा आधारस्तंभ -- चेतेश्वर पुजारा
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजाऱ्याने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून भारताला विजयाच्या समीप आणून ठेवले. त्याची खेळी बघून ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल हेसुद्धा पुजाराच्या खेळीमुळे चांगलेच प्रभावित झाले.
खरे तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे म्हणजे फार कठीण काम असते. यासाठी फलंदाजाकडे तंत्रशुद्ध पद्धतीनं खेळण्याचं कसब अंगी असावं लागत तसेच त्याच्याकडे संयम असावा लागतो. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर सयंमी खेळी करून विकेट टिकवणं व त्याबरोबर संघासाठी धावा काढणं हि जबाबदारी असते. याआधी राहुल द्रविडने हि जबाबदारी पेलली आहे व आता चेतेश्वर पुजारा हि जबाबदारी पेलत आहे.
आत्ताच्या कसोटीत चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धीराने सामना करून पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकवले. त्याने दोन्ही डावात जबाबदारी पूर्वक खेळी केली. त्यामुळेच भारताला विजयाची संधी प्राप्त झाली. चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविड सारखीच तिसऱ्या क्रमांकावर येऊन संयमी व जबाबदारी पूर्वक खेळी केली त्यामुळेच इयान चॅपेल यांनी "पुजारा हा भारतीय संघासाठी दुसरा द्रविडच आहे." असे उद्गार काढून त्याचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment