Monday, December 10, 2018

शिवाजी महाराजांची रणनीती -- गनिमी कावा भाग १




शिवाजी महाराजांची रणनीती -- गनिमी कावा  भाग १

          गनिमी कावा म्हणजे शत्रुपक्ष गाफील असताना अचानक केलेला हल्ला. गनिमी कावा हि शिवाजी महाराजांची रणनीती होती. शिवाजी महाराजांकडे सैन्य व शस्त्रसाठा कमी होता पण त्यांना डोंगर कपाऱ्यांची पुरेपूर माहिती होती. याचा उपयोग त्यांनी लढायांसाठी केला. शिवाजी महाराजांचे मावळे डोंगर कपारीत झाडा-झुडपात लपून शत्रूवर अचानक हल्ला करत. त्यामुळे सैन्याची पाळता भुई थोडी व्हायची. 
          पुढील प्रसंगांवरून लक्षात येईल कि शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने शत्रूला कसे नामोहरम केले. राज्यावर अफझलखानाच्या रूपात मोठे संकट आले होते. बाया-बापड्यांची विटंबना चालवली होती. देवळे फोडली जात होती. लुटालूट जाळपोळ होत होती. संपूर्ण राज्यात आहाकार माजला होता. राज्यावरील हे संकट कसे टळले जाईल या विवंचनेत सर्व जण होते. खानाचा मुक्काम वाईत होता. शिवाजीस दगा फटका करून, कैद करून विजापुरास न्यावे असा खानाचा हेतू होता. दगा करण्याचा हेतू शिवाजी महाराजांना ठाम कळला. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांबरोबर खलबते केली आणि खानाला प्रतापगडाच्या एका सोंडेवर भेटायला बोलवायचे असे ठरले. पंताजी गोपीनाथ यांचेबरोबर खानासाठी शिवाजी महाराजांनी एक खलिता पाठविला व त्यात असे लिहिले कि, "मला आपणाबद्दल केवढा आदर व धाक वाटतो पण तुमचे सैन्य बघून मी पार घाबरून गेलो आहे. मला तुमची भीती वाटत आहे. तरी आपण एकट्यानेच गडाजवळ यावे व आपली भेट घडावी असे वाटत आहे." खानाने खलिता वाचला. शिवाजी आपल्याला घाबरतो हे पाहून खान बेहद्द खुश झाला. त्यात पंतांनी शिवाजी तुम्हाला किती घाबरतो हे तिखट मीठ लावून सांगितले. हे ऐकून तर खानाच्या मनात उकळ्या फुटू लागल्या. कधी एकदा शिवाजीला पकडतो असे खानाला झाले. 
          भेटीचा दिवस उजाडला. शिवाजीचे काय होणार? स्वराज्याचे काय होणार? ह्याच चिंतेत सर्वजण होते. शामियाना भेटीसाठी सज्ज होता. खान शिवाजीची वाट पहातच होता. शिवाजी महाराज निवडक दहा मावळ्यांसह खानाच्या भेटीसाठी निघाले. महाराज शामियान्यापाशी आले. महाराजांना बघून खान छद्मीपणे हसला. "आवो, शिवाजी आवो! इस अफझलखान कि गले लगाओ!" असे म्हणून खानाने महाराजांना आलिंगण देण्याकरिता दोन्ही हात पसरले. खानाने महाराजांना मिठी मारली व महाराजांची मान आपल्या डाव्या काखेत पकडली व घट्ट दाबली. खानाने एकदम कट्यार काढली आणि दात-ओठ खाऊन महाराजांच्या पाठीत खुपसली पण चिलखत असल्याने कट्यार महाराजांना लागली नाही. महाराजांनी अत्यंत चपळाईने भीचव्याचे तीक्ष्ण पाते खानाच्या पोटात खुपसले. खानाची आतडी बाहेर आली. पहाडासारखा खान जमिनीवर कोसळला. खानाचा सपशेल पराभव झाला. 

भाग २ पुढील ब्लॉगमध्ये 










          













No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...