हॉकी खेळाडू मीररंजन नेगी
चक दे हॉकी
मध्यंतरी शाहरुख खानचा चक दे इंडिया हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमात शाहरुख खानने महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली. यात त्याने महिला हॉकी संघास विजेतेपद मिळवून दिले असे दाखविले आहे. खरे तर हा एका खेळाडूवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमामुळे एका हॉकी खेळाडूची सत्य घटना लोकांना बघायला मिळाली. या खेळाडूचे नाव मिररंजन नेगी.
माजी हॉकी खेळाडू मिररंजन नेगी यांनी आयुष्यात बरेच चढ उतार पाहिलेले आहेत. १९८२ सालच्या आशियायी स्पर्धांमध्ये हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून १-७ अशा मोठ्या फरकाने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. सर्व हॉकीप्रेमी, देशबांधव, प्रसार माध्यमांनी या पराभवास भारतीय गोलकिपर नेगी यांनाच जबाबदार धरले. त्यांच्यामुळेच सामना हरला असा ग्रह सर्वांचा झाला. त्यामुळे पाकिस्तानचा हस्तक असे हिणवत नेगींना मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. हि गोष्ट त्यांच्या मनाला एवढी लागली कि त्यांची खेळातील कारकीर्द संपुष्टात आली. त्यांची कारकीर्द संपुष्टात आली तरी त्यांच्यातील खेळाडू अजून जिवंत होता. त्यांचे पहिले प्रेम हॉकीवर होते. म्हणूनच २००४ मधील आशियायी स्पर्धेमध्ये महिला हॉकी संघासाठी सहाय्यक प्रशिक्षकाचे आव्हान स्वीकारले. महिला हॉकी संघास विजेतेपद मिळवून देत त्यांनी आपली खेळावरील निष्ठा सिद्ध केली.
No comments:
Post a Comment