Saturday, December 22, 2018

समुद्र



समुद्र 

फिरता समुद्र किनारी, सरकती पाय वाळू वरुनी 
दूर लांब अथांग पसरलेला,
थांग न लगे याचा मनापरी ।। १ ।।

ओले पाय माझे, शिरशिरी अंगावरती 
मन भीतीने कातर,
जशी लाट येई अंगावरी ।। २ ।।

आहेस कोठे तू, नजर भिरभिरे माझी,
सागर साथ देण्या आहे तरी, 
आक्रंदती अंतरे माझी ।। ३ ।।

चंद्र तू, मी सागर आहोत दूर असे,
तुझ्या असण्याने माझ्या प्रेमाच्या 
भरती ओहोटीचे अंतर जसे! ।। ४ ।। 














No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...