शिवाजी महाराजांची रणनीती -- गनिमी कावा भाग २
ब्लॉग १ वरून पुढे चालू
स्वराज्यावर आलेले दुसरे अस्मानी संकट म्हणजे शाइस्तेखान. शाइस्तेखान अफाट सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. त्याने जाळपोळ, लुटालूट, बाया-बापड्यांवर अत्याचार चालू केले. मंदिरे उद्व्ह्स्त झाली, मूर्ती फुटू लागल्या. गावेच्या गावे घाबरून पळू लागली. शाइस्तेखान पुण्यात घुसला. त्याने आपला मुक्काम लाल महालात केला.
स्वराज्यावर आलेले हे अस्मानी संकट कसे परतवून लावायचे ह्या विवंचनेत शिवाजीराजे होते. अखेर महाराजांनी डाव ठरविला. स्वतः रात्रीच्या मध्याला लाल महालात शिरायचे व खानालाच उडवायचे. असा डाव ठरविला त्याप्रमाणे शिवाजीराजे लाल महालात शिरले. शिवाजीने केलेला अचानक हल्ला बघून खान जनानखान्यात बायकांमध्ये दडून बसला. महाराजांनी पडदा फाडला त्याबरोबर बायकांनी किंकाळी फोडली व खान आपली तलवार घेण्यासाठी उठला. महाराजांची नजर खानावर गेली. महाराज खानावर धावले परंतु खान घाबरून खिडकीतून पळून जावू लागला. महाराजांनी घाव टाकला पण घाव त्याच्या उजव्या हाताच्या बोटांवर बसून तीन बोटे तुटली. खान आपला जीव मुठीत धरून पळत सुटला. खानाच्या जीवावर आले पण बोटांवर निभावले.
पहिल्या प्रसंगात शिवाजी महाराजांनी, "मला तुमची भीती वाटत आहे. मी घाबरलेलो आहे." असे अफझलखानाला सांगून भुलवत ठेवले तर दुसऱ्या प्रसंगात शाइस्तेखान गाफील असताना अचानक हल्ला केला. अफझलखान व शाहिस्तेखानच्या रूपात स्वराज्यावर आलेले संकट शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने परतवून लावले.
No comments:
Post a Comment