Tuesday, December 11, 2018

।। श्रीरामा ।।


।। श्रीरामा ।।

माझ्याकडून तुझ्याकडे झेपावणारे, 
मन हे माझे श्रीरामा,
तुझेच होऊन राहिले ।। ध्रु ।।

स्मरणात गेले तारुण्य,
सरत आले दिवस वृद्धत्वाचे,
क्षीण होऊ लागली काया, 
मन तुझ्याकडेच झेपावू लागले,
तुझेच होऊन राहिले ।। १ ।।

नाही काही माझ्याकडे,
तुझ्याचं प्रेमाशिवाय,
तेचं वाहीन तुझ्याचं चरणी,
पुष्पांच्या माळा अन,
उष्टी बोरे श्रीरामा,
येशील ना रे एकदा शबरीच्या आश्रमा? ।। २ ।।














No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...