Saturday, September 8, 2018

गणपतीच्या आरत्या




गणपतीच्या आरत्या 

१) 
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । 
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।
जय जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मन कामनापूर्ती ।। ध्रु ।।
रत्नखचित फरा तुजगौरी कुमरा ।
चंदनाची उटी कुंकुम केशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती ।। २ ।।
लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्र तुण्डत्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मन कामनापूर्ती ।। ३ ।।

२)

तूं सुखकर्ता तूं दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी । गणपतीबाप्पा मोरया ।। ध्रु ।।
मंगलमूर्ती तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ।
तुझिया दारी आज पातलों । देई चित्त मज ध्याया ।। १ ।।
तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्देचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळुनी आमुचा । निमवी नैराश्याला ।। २ ।।
तूं माता तूं पिता जागीं या । ज्ञाना तूं सर्वस्व जागीं या ।
पामर मी वर उणे भासती । तुझी आरती गाया ।। ३ ।।
मंगलमूर्ती मोरया । गणपतीबाप्पा मोरया । 

३)

नाना परिमल दुर्वा शमीपत्रे ।
लाडू मोदक अन्ने परिपूरितपातें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। धृ ।।
तुझा ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्याची सकलहि पापे विघ्नेही हरती ।।
वाजिवरण शिबिका सेवक सूत युवती ।
सर्वही पिलवुनी अंती भवसागर तरती ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। २ ।।
शरणागत सर्वस्वे भजती जव चरणी ।
कीर्ती तयांची राहें जोवर शशितरणी ।।
त्रैलोक्योते विजयी अदभुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। धृ ।।

४)
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दो दिल लाल बिराजे सुतगौरीहरको ।।
हाथ लिये गुड लड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लगतहून पदको ।। १ ।।
जय जयजी गणराज विद्द्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।। धृ ।।
अष्ट सिद्धी दासी संकटको वैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ।।
कोटीसूरज प्रकाश ऐसी छबी तेरी ।
गंडस्थल मदमस्तक झुले शशिबहारी ।।
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।। २ ।।
भाव भगतिसे कोई शरणागत आवे ।
संतती संपत्ति सबही भरपूर पावे ।।
ऐसे तुम महाराज मोको अतिभवे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।। ३ ।। 



गणपतीबाप्पाची आरती 











No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...