Sunday, September 2, 2018

सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश

सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश 

               श्री गणेश हे सांगलीकरांचे आराध्य दैवत आहे. गणरायाबाबतच्या श्रद्धेत धर्माबाबतच्या भिंती आड येत नाहीत. गणेशोत्सवामध्ये संस्थानचा पाच दिवस गणपती बसतो. या गणपतीचे पाचव्या दिवशी विसर्जन होते. हे विसर्जन म्हणजे जिल्ह्याचा सोहळाच असतो. या विसर्जन सोहळ्यात सर्वधर्मीय लोक भाग घेऊन श्रद्धेने गणेशरथावर पेढे, खोबऱ्याचा वर्षाव करतात. या सोहळ्याची परंपरा सुमारे २०० वर्षांपासून चालत आलेली आहे. कृष्णाकाठावरील गणेश मंदिरात दर संकष्टीला अलोट गर्दी होते. भारतीय वास्तू शिल्पकलेचा प्रभाव असलेले सांगलीतील प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. 
               हे मंदिर बांधण्यास १८११ चे सुमारास सुरवात झाली व १८४४ मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. सांगली संस्थांनचे अधिपती थोरले चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी मंदिरातील गणपती पंचायतनाची यथाविधी पूजा केल्याचा उल्लेख आहे. श्री गणपती पंचायतनातील शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण व गणपती अशी पाच मंदिरे येथे आहेत. मध्यवर्ती गणेश मंदिर आहे. रिद्धी-सिद्धींसह गणेशाची संगमरवरी अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. या मूर्तीसाठी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथून आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी एक दगड अप्पासाहेब पटवर्धन यांनी मिळवला. मूर्ती आणि मंदिराचे सर्व काम स्थानिक कारागिरांनी केले. गणेशाचे सिंहासन घडविण्यासाठी जोतिबा डोंगरावरील दगड आणण्यासाठी काही माणसे पाठवण्यात आली होती. थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी मंदिराची उभारणी मोठ्या भक्तिभावाने केली. ते संस्थानचा कारभारही गणपतीच्या नावानेच करीत असत. आजही मंदिराचा कारभार श्री गणपती पंचायतन ट्रस्टद्वारे सांभाळला जातो.  



सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश 


गणपतीचे आकर्षक मंदिर 













No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...