Saturday, September 1, 2018

हेदवीचा श्रीदशभुजा वल्लभेश

हेदवीचा श्रीदशभुजा वल्लभेश 

          रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी हे एक जागृत देवस्थान आहे. हेदवी गावापासून एक कि. मी. अंतरावरील डोंगराच्या पठारावर मध्यभागी श्रीदशभुजा वल्लभेशाचे मंदिर आहे. हा गणपती पेशवेकालीन आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा खुद्द पेशव्यांच्याच हस्ते होणार होती मात्र काश्मीरहून गणेशमूर्ती येण्यास विलंब झाला म्हणून दुसरी मूर्ती स्थापन करण्यात आली आणि हि मूर्ती केळकर स्वामींना भेट देण्यात आली. त्यांनी या गणपतीची स्थापना आपल्या गावी हेदवी येथे केली. 
          एका टेकडीवर पठारावर असलेले हे मंदिर चोहोबाजूंनी डोंगर-शिखरांनी वेढलेले आहे. मंदिराचा सभामंडप भव्य असून, मंदिरासभोवती दगडाची भक्कम अशी तटबंदी केलेली आहे. मंदिराच्या आवारात दगडी दीपमाळा आहेत. आवारात सुंदर अशी फुलबाग बनवलेली आहे. अत्यंत निसर्गरम्य असे हे स्थान आहे. 
               मूर्ती पांढऱ्या पाषाणाची असून दहा हातांची व तिच्या सर्व हातात त्रिशूळ, गदा, धनुष्य, चक्र, पद्म अशी विविध आयुधे आहेत. गळ्यात नागाचे जानवे असून मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर वल्लभा नावाची शक्ती विराजमान आहे. अशी दशभुजा मूर्ती फक्त नेपाळमध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून आपण मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहते आहे असे वाटते. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट असून ती एका उच्चासनावर विराजमान आहे. इथे भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायकी चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी होते. 


हेदवीचा श्रीदशभुजा वल्लभेश 







No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...