"गणेश चतुर्थी" हा विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव. गणेश हि बुद्धी आणि पराक्रमाची देवता आहे. गणेश हा सुखकर्ता, दु:खहर्ता, संकटनाशक, मंगलकारक आहे तसेच तो कलांचा व विद्द्येचा दाताही आहे. अश्या ह्या गणेशाचा उत्सव भाद्रपदात येतो. हा उत्सव महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यात उत्साहाने व धामधुमीत साजरा केला जातो. कुठल्याही शुभकार्याचा आरंभ गणेशपूजनानं होतो. महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. अष्टविनायक तर फार प्रसिद्ध आहेत. मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव या गणपतींच्या ठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी असते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत "गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया" च्या गजरात प्रत्येक घरी गणपती बाप्पाचे आगमन होते. या दिवशी घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशाला मोदक प्रिय असल्याने २१ मोदकांचा नैवेद्द दाखवला जातो. दुर्वा, कमळ, केवडा, जास्वंद, इतर पत्री यांनी गणेशाची षोडशोपचारे पूजा केली जाते. शेंदूर आणि गुलाल गणेशाला लावला जातो. अथर्वशीर्षाची २१ आवर्तनं केली जातात. कर्पूरारती केली जाते. गणपतीला गुळ खोबरे, मोदक यांचा नैवेद्द्य दाखवला जातो.
मोरया गोसावी हे गणेशाचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. पुण्यातील चिंचवडजवळ त्यांची समाधी आहे. "गणपती बाप्पा मोरया" या जयघोषात या गणेशभक्ताचंही नामस्मरण केलं जातं.
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस हा उत्सव चालतो. काही घरात अर्धा दिवस, दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तर काहींच्या घरात अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बसवण्याची प्रथा आहे. या दिवसात घरातील वातावरण प्रसन्न असते. लहानांपासून थोरांपर्यंत गणेशभक्तीत गढलेले असतात. सकाळ-संध्याकाळ गणेशाची आरती चालते. गणेशाला गोडाचा नैवेद्द्य दाखवला जातो. गणेशासमोर विद्द्युतरोषणाईची आरास केली जाते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची वाजत गाजत, ढोल ताश्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली जाते. या दिवशी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत गणपतीला भावपूर्व निरोप दिला जातो. या दहा दिवसात गणपती पाहुणा म्हणून येतो आणि सर्वांची मनं जिंकतो. सर्वांना आपलेसे करतो.

अष्टविनायक
No comments:
Post a Comment