मि. नटवरलाल
हा चित्रपट ८ जून १९७९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता टोनी ग्लाड असून दिग्दर्शक राकेश कुमार आहेत. या चित्रपटाची कथा ग्यानदेव अग्निहोत्री यांनी लिहिली असून पटकथा राकेश कुमार यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली असून राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केली आहेत. 'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' हे गाणे अमिताभ बच्चन यांनी गायले असून अन्य गाणी मोहमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, उषा मंगेशकर अनुराधा पौडवाल, आशा भोसले यांनी गायली. लता मंगेशकर व किशोर कुमार यांनी गायलेले व अमिताभ व रेखा यांच्यावर चित्रित झालेले 'परदेसीया, परदेसीया' हे गाणे सुपरहिट झाले. अमिताभ बच्चन, रेखा, अजित, अमजद खान यांच्या मुख्य भुमिका आहेत.
चित्रपटाचे नाव आणि मुख्य व्यक्तीरेखा कुख्यात भारतीय ठग नटवरलाल यांच्यापासून घेतले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ठय म्हणजे अमिताभ बच्चन यांनी 'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' या लहान मुलांच्या गाण्यासाठी पहिल्यांदाच आपला आवाज दिला. नंतर लावारीस, सिलसिला, पुकार या चित्रपटात त्यांनी गाण्यासाठी आपला आवाज दिला. या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये झाले असून बहुतांश शूटिंग बीरवाह, जम्मू-काश्मीर येथे झाले आहे.
'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' या गाण्याचा किस्सा --
अमिताभ बच्चन यांनी 'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' या लहान मुलांच्या गाण्यासाठी पहिल्यांदाच आपला आवाज दिला. याआधी हे गीत संगीतकार राजेश रोशन किशोर कुमारकडून गाऊन घेणार होता परंतु हे गीत कहाणीच्या स्वरूपातील आहे व त्यात संवाद अधिक आहेत तेव्हा हे गीत खुद्द अमिताभनेच गावे अशी सूचना गीतकार आनंद बक्षी यांनी केली. सुरवातीला हे गीत गायला अमिताभ राजी नव्हता परंतु आनंद बक्षी यांनी विनंती केल्यावर अमिताभने हे गीत गायले. हे गीत लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.
अमिताभचे फेमस डायलॉग --
१) हर चोर अपनी मौत मरता नहीं, मारा जाता है ।
२) तु तो अपने साथीयोंको भी धोका दे सकता है... लेकिन मै अपने दुश्मन से किये हुए वादे को भी पूरा करता हूँ ।
कथानक --
नटवर हा युवक असून त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा मोठा भाऊ गिरीधारीलाल आहे. तो पोलीस अधिकारी असतो. गिरीधारीलालला मोठा गुन्हेगार असलेला विक्रम लाच घेण्याच्या गुन्ह्यात फसवतो.
नटवर जेव्हा मोठा होतो तेव्हा श्री नटवरलाल म्हणून एक रहस्यमय अंडरवर्ल्ड व्यक्तिरेखा म्हणून स्वतःसाठी एक गुप्त ओळख निर्माण करतो. तो विक्रमाचा हळूहळू पण निश्चितपणे सूड घेण्याचा निर्धार करतो. गिरीधारीलालला त्याचा हेतू समजत नाही आणि त्याच्याबद्दल राग निर्माण होतो.
एक कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड व्यक्ती आणि विक्रमचा माजी सहकारी याचेकडून नटवरला कळते कि विक्रम चंदनपूर नावाच्या गावात आहे. आणि मिकीचा एक सहकारी फकीरचंदच्या ताब्यात असलेला हिऱ्याचा हार विक्रमला पाहिजे. नटवर हार चोरतो. यातच असे कळून येते कि विक्रमने मिकीचापण विश्वासघात केलेला असतो त्यामुळे मिकीसुद्धा विक्रमचा बदला घ्यायला उत्सुक असतो. मिकी खुलासा करतो कि गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी विक्रम एका वाघाचा उपयोग करत असतो. अवतारसिंगच्या वेशात नटवर चंदनपूरला पोहचतो.
नटवर विक्रमचा कसा बदला घेतो हे चित्रपटगृहातच जावून बघायला हवे.
'परदेसीया, परदेसीया' हे गाणे सुपरहिट
No comments:
Post a Comment