Saturday, August 27, 2022

अवीट गोडीचे गाणे - तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल, नका सोडुन जाऊ, रंगमहाल

 

अवीट गोडीचे गाणे - तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल, नका सोडुन जाऊ, रंगमहाल

           'तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल, नका सोडुन जाऊ, रंगमहाल' हे अजरामर गीत पिंजरा या चित्रपटातील आहे. ह्या गीताचे बोल लिहिले आहेत जगदीश खेबूडकर यांनी तर हे गीत संगीतबद्ध केले आहे राम कदम यांनी. उषा मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. 

          खेबूडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा या चित्रपटातील गाणी. ह्या चित्रपटासाठी खेबूडकर यांनी तब्बल ११० गाणी लिहिली त्यातली ११ गाणी निवडण्यात आली. या ११ गाण्यांपैकी 'तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल, नका सोडुन जाऊ, रंगमहाल' हे गाणे आहे. ह्या गाण्याचा किस्सासुद्धा रंजक आहे. शांताराम बापूंनी या चित्रपटासाठी खेबूडकरांकडून ४९ लावण्या लिहून घेतल्या परंतु त्यातील एकही लावणी शांताराम बापूंना आवडली नाही. ह्या लावण्या बापूंना आवडल्या नसल्यामुळे खेबूडकर निराश झाले व घरी परतले. सतत लावणीचाच विचार डोक्यात घोळत असल्याने त्यांना झोपही लागत न्हवती. झोप पार उडाली होती. असाच लावणीचा विचार करत असता त्यांना रात्री दोन वाजता 'तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल, नका सोडुन जाऊ, रंगमहाल' ह्या लावणीचे बोल सुचले व त्यांनी लगेच शांताराम बापूंना फोन करून हे बोल ऐकवले. बापूंना ह्या लावणीचे बोल इतके आवडले कि त्यांनी खेबूडकरांना शाबासकी दिली. ही लावणी राम कदमांनी लगेच संगीतबद्ध केली व उषा मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली.

                                              तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
                       नका सोडुन जाऊ, रंगमहाल

पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल

हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल

लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्‍हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ

 


 

 


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...