Saturday, June 25, 2022

आनंदाचे डोही आनंद तरंग ।

 


 

 आनंदाचे डोही आनंद तरंग ।

          आपण एखाद्याला आनंद देतो म्हणजे काय तर आपणच केलेल्या एखाद्या चांगल्या कृतीतून दुसऱ्याचे समाधान करतो, सुख प्राप्त करतो आणि दुसऱ्याच्या सुखात आपले सुख शोधतो ते सुख म्हणजेच आनंद होय. आपल्या हातून एखादे सत्कर्म घडले म्हणजेच निःस्वार्थ भावनेने दानधर्म केला, एखाद्याची सेवा केली, दीन-दुबळे, गरीबांना मदत केली तर त्यातून जो आपल्याला आनंद मिळतो तो सर्व सुखाच्या पलीकडचा असतो. पैसा-अडका, धनदौलत, संपत्ती या गोष्टींपासून आपल्याला क्षणिक आनंद मिळतो कारण या आनंदाबरोबर चिंता, दुःख बरोबर येत असतात. आपल्याकडे आहे ती संपत्ती, धनदौलत संपणार तर नाही ना किंवा यात आणखी कशी भर पडेल याची चिंता लागून राहिलेली असते तसेच यातील संपत्ती, पैसा नष्ट झाला किंवा खर्च झाला, चोरून नेला तर दुःख प्राप्त होते. म्हणूनच पैसा-अडका, संपत्ती या क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत व या गोष्टींपासून मनाचे समाधान होण्याऐवजी मानसिक त्रासच होत असतो कारण या गोष्टी मिळवण्यासाठी माणूस या गोष्टींच्या मागे धावत सुटतो व आपले सुख गमावून बसतो. 

          "मन आनंदी तर सर्व काही आनंदी" अशी एक म्हण आहे. खरोखरच आपले मन आनंदी असेल तर आपल्याजवळ असणाऱ्या सर्व गोष्टींपासून आनंद मिळवता येतो. फक्त तो आनंद कसा मिळवायचा हे आपण ठरवले पाहिजे. अगदी साध्या गोष्टीतूनही आपल्याला आनंद मिळवता येतो. वाचनातून, लिखाणातून, संगीत ऐकण्यातून, चांगल्या ठिकाणी फिरायला जाण्यातून, लोकांशी संवाद साधण्यातून, समाज कार्यातून इ. अशा गोष्टींपासून मनाला आनंद मिळतो. या आनंदातूनच चांगले विचार (happy thought) मनात येतात. चांगल्या विचारांमुळे मनातील नकारार्थी विचार (nigetive thinking) निघून जाऊन सकारात्मक विचार (possitive thinking) येतात व हेच विचार आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतात. 

         तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, "आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचे ।।" तुकाराम महाराजांवर एकामागून एक आपत्ती येत होत्या, संकटे कोसळत होती तेव्हा त्यांनी भक्तीमार्ग स्विकारला. ते विठ्ठलाची भक्ती करू लागले. त्यातूनच त्यांना आनंद, समाधान मिळू लागले. म्हणूनच आपले मन आनंदीत, प्रफुल्लीत ठेवले पाहिजे. मनातील नकारात्मक विचार झटकून सकारात्मक विचार केले पाहिजेत तरच आपले जीवन आनंदमय, चैतन्यमय वाटू लागेल. जीवनाचा पूर्ण आस्वाद घेता येईल. 

 

 BEE HAPPY 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...