अवीट गोडीचे गाणे -- सख्या रे घायाळ मी हरिणी
" सख्या रे घायाळ मी हरिणी" हे अवीट गोडीचे गाणे सामना या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटात श्रीराम लागू, निळू फुले, मोहन आगाशे, स्मिता पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणी जगदीश खेबूडकर, आरती प्रभू यांनी लिहिली असून भास्कर चंदावरकर यांनी संगीतबध्द केली आहेत. या चित्रपटातील गाणी रविंद्र साठे, उषा मंगेशकर व लता मंगेशकर यांनी गायली आहेत. या चित्रपटात निळू फुले व श्रीराम लागू या दोघांची अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळते. दोघांनी उत्कृष्ठ अभिनय करून हा चित्रपट अजरामर केला.
हा महाल कसला रानझाडी हि दाट
अंधार रातीचा कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडान घातला घाव, केली कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी ।। १ ।।
काजळकाळी गर्द रात अन कंप कंप अंगात
सळसळणाऱ्या पानांनाही रातकिडयांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी
सख्या रे, घायाळ मी हरिणी ।। २ ।।
गुपित उमटले चेहऱ्यावरती भाव आगळे डोळ्यात
पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी
सख्या रे, घायाळ मी हरिणी ।। ३ ।।
No comments:
Post a Comment