मराठी कविता -- हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। धृ ।।
ना आम्ही मागे सरत, ना आम्ही घाबरत
दिसताच शत्रू आम्ही त्यांच्यावर तुटून पडतो,
शत्रू असो कोणीही आम्ही प्राणपणाने लढतो
हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। १ ।।
चीन असो कि पाकिस्तान, कि असोत दहशतवादी
झाली कितीही आक्रमणे,
त्यांच्याशी आम्ही निर्भयपणे लढतो,
लागता गोळी आम्ही शहीद होतो
हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। २ ।।
ना आम्हाला जात ना धर्म,
ना आम्हाला प्रांत ना भाषा यांचे बंधन
भारतमातेच्या छत्राखाली आम्ही राहतो,
तिरंग्याला आम्ही सलाम करतो
हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। ३ ।।
लेखक -- संतोष जोशी
गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा
No comments:
Post a Comment