Thursday, July 16, 2020

मराठी कविता -- बाहुली



मराठी कविता -- बाहुली

          कवियत्रीने या कवितेत शो केस मधल्या बाहुलीचे वर्णन केले आहे. हि बाहुली दिसते कशी तर गोड, गोबरी, गोरी गोरी. तिचे डोळे टपोरे आहेत. बाहुलीने गुलाबी साडी घातली आहे व केसात वेणी माळली आहे. तिच्या गालावर हसू उमटले आहे. अशी हि शो केसमधील सुंदर बाहुली कवीयत्रीला खुणावत आहे. हि बाहुली  कवियत्रीच्या हाती लागली तेव्हा कवियत्रीला मनातून आनंद झाला. तिने बाहुलीला आपल्या हृदयाशी धरून तिच्या गालाचे चुंबन घेतले.       


गोड, गोबरी, गोरी - गोरी,

टपोरे डोळे, नखरे भारी,

खुणावत राही मज,

शो केस मधली एक बाहुली।।१।।



गुलाबी साडी, केसात वेणी,

गाली हसू लेऊनी आली,

हाती परी मज लागली,

शो केस मधली एक बाहुली।।२।।



उदास मी परी! हर्ष मनी,

हाती आली एकदा ती,

चुंबन तिज गाली, धरले हृदयी,

सुमानांपरी भासली,

शो केस मधली एक बाहुली।।३।।
कवियत्री -- सोनाली बेल्लूबी  
  

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...