Wednesday, July 15, 2020

मराठी कविता -- प्रकाशातले तारे तुम्ही (इयत्ता ३ रीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता)

 

मराठी कविता -- प्रकाशातले तारे तुम्ही (इयत्ता ३ रीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता)

           "प्रकाशातले तारे तुम्ही" हि बालकविता उमाकांत काणेकर यांनी लिहिली आहे. हि कविता महंमद रफी यांनी गायली असून या कवितेला संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिले आहे. हि कविता इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात दिली आहे. 
         लहान मुले म्‍हणजे देवाघरची फुले.लहान मुलांना या कवितेत  अंधारातुन प्रकाशाकडे जाण्‍यास कवि सांगत आहे. या कवितेत कवी मुलांना हसायला व आनंदी राहायला सांगत आहे. कवी मुलांना अंधारावर रुसा म्हणत आहे म्हणजेच मागच्या सर्व चिंता विसरून उद्या सूर्याबरोबर येणाऱ्या आनंदाच्या शिखरावरती जाऊन बसायला सांगत आहे. या कवितेत कवीने मुलांना प्रकाशातल्या ताऱ्यांची उपमा दिली आहे.
 
प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा
हसा मुलांनो हसा ।। धृ ।।


तुम्हा बोलवी ती फुलराणी
खेळ खेळती वारा-पाणी
आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाउन बसा ।। १ ।।

रडणे हा ना धर्म आपुला
हसण्यासाठी जन्म घेतला
भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटु दे ठसा ।। २ ।।

सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणावितो कसा ।। ३ ।।

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...