Monday, January 20, 2020

धोनीने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी

 

धोनीने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी 

          महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघाला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. त्याने आपल्या फलंदाजीने व हेलिकॉप्टर शॉटने तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्याचे यष्टीरक्षणातील चापल्य तर वाखणण्याजोगे होते. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच फलंदाजाला यष्टिचीत करून धोनीने फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आहे. संघ अडचणीत असताना शांत डोक्याने फलंदाजी करून त्याने संघाला विजयी करून दिले आहे तसेच मैदानावर शांत चित्ताने विचार करून प्रतिस्पर्धी संघाविरुध्द आडाखे बांधले आहेत. त्यामुळेच त्याला 'कॅप्टन कूल' हि उपाधी मिळाली आहे. धोनीने २००७ मध्ये झालेली टी - २० विश्वचषक स्पर्धा व २०११ साली झालेली आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकून भारतीय संघाची मान उंचावली. धोनीने यष्टीरक्षक, फलंदाज व कर्णधार या तीनही आघाडयांवर आपली जबाबदारी पेलली. आपल्या निर्णयाचे अचूक टायमिंग राखत त्याने भारतीय संघाला विजयी केले आहे. परंतु निवृत्तीचे त्याचे टायमिंग चुकत आहे. खरेतर भारतीय क्रिकेटला त्याने भरभरून दिले आहे. तसेच आता भारतीय संघात तरूण व उदयोन्मुख खेळाडू खेळत आहेत व चांगली प्रगतीही करत आहेत. अशावेळेस धोनीने संघात येण्याची आशा न बाळगता सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी व तरूण खेळाडूंना मार्गदर्शन करावे. 
          कोणत्याही श्रेणीत करारबध्द न झाल्याने त्याच्या खेळावर उद्भवलेले प्रश्नचिन्ह त्याच्या निवृत्तीचे संकेत देत आहेत. आज धोनीच्या निवृत्तीची चर्चाच जास्त होताना दिसत आहे. अशावेळेस धोनीनेच निवृत्ती स्वीकारून चर्चेला पूर्णविराम द्यावा. 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...