Sunday, January 19, 2020

कविता -- कावळे दादाचे दुःख

 
कविता -- कावळे दादाचे दुःख 


पक्षी गातात झाडांवर,
फुलपाखरे खेळतात फुलांवर, 
कोकीळ गाते आंब्यावर, 
कावळेदादा का दुःखाने बसला 
सुकलेल्या झाडावर ? ।। १ ।।

आनंदाने पावसात नाचतो मोर, 
पोपट विठूविठू करतो पेरूच्या झाडावर, 
चिमणी घरटं बांधते झाडावर,
कावळेदादा का दुःखाने बसला 
सुकलेल्या झाडावर ? ।। २ ।।

दुरून हिरवेगार दिसतात डोंगर,
वाटे हिरवा सदरा घातला अंगावर,
झाडे नाचतात वाऱ्यावर,
कावळेदादा का दुःखाने बसला 
सुकलेल्या झाडावर ? ।। ३ ।।

माकड उडया मारते झाडावर,
वेड लागेल कावळेदादा तुला लवकर,
तू पण सर्वांबरोबर मौजमजा कर,
नको बसू त्या सुकलेल्या झाडावर ।। ४ ।।













 











 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...