Friday, January 10, 2020

कविता -- नवरा

 कविता -- नवरा 

नवरा जर नसेल तर 
राजवाडा पण सुना आहे,
नवऱ्याला कमी लेखणे हा 
अक्षम्य गुन्हा आहे ।

खरं पाहिलं तर त्याच्याशिवाय 
कोणतेही पान हालत नाही... 
घरातलं कोणतंच सुख 
नवऱ्याशिवाय फुलत नाही... 

नोकरी अन पगाराशिवाय 
नवऱ्याजवळ असतं काय,
असं म्हणणाऱ्यांना आता 
सांगाव तरी काय ?

स्वच्छ, पवित्र घरच मुळी 
नवऱ्यानच घेतलेलं असत,
मात्र विचित्र माणूस म्हणून 
सौन्दर्य त्याला हसत बसतं. 

पगार मर्यादित असूनसुध्दा 
सर्वांना त्यास पोसायचे असते... 
म्हणूनच नवऱ्याचे वय 
बायकोपेक्षा जास्त असते... 

त्याचा दोष काय तर म्हणे 
काटकसर करायला लावतो,
कुटुंबाच्या कल्याणासाठी 
बिचारा रात्रंदिवस धावतो. 

नवरा म्हणजे अंगणामागचा 
भक्कम चिरेबंदी वाडा !
बायको म्हणजे यात ठेवलेला 
पवित्र अमृतघडा !

नवरा म्हणजे सप्तरंगी 
इंद्रधनुष्यामागचं आभाळ !
सौन्दर्य खुलवणाऱ्या कुंकवामागचं 
भव्य-दिव्य उदार भाळ !

कधीतरी चारचौघात 
त्याच हि कौतुक करावं !
त्याच्या अबोल दुःखाचं 
एक तरी गीत लिहावं !




















 




















 




















 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...