'हॉल ऑफ फेम' सचिन तेंडुलकर
विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा 'हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश
भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 'हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारा सचिन भारताचा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. या आधी सुनील गावस्कर, बिशनसिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांना हा सन्मान मिळाला आहे. निवृत्ती नंतर पाच वर्षांनी 'आयसीसी' खेळाडूची क्रिकेटमधील कामगिरी बघून 'हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करते. सचिनची क्रिकेटमधील कामगिरी व योगदान बघून आयसीसीने सचिनला हा सन्मान दिला.
सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर २०१३ मध्ये निवृत्ती घेतली होती. त्याआधी त्याने २०० कसोटी सामने खेळले. २०० कसोटी सामने खेळणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिनने कसोटीत १५९२१ धावा तर एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत ५१ तर एकदिवसीय सामन्यात ४९ शतके झळकावली आहेत. शतकांचे शतक करणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. २०११ मधील विश्वचषक स्पर्धेमधील विजयी संघातील सचिन सदस्य आहे.
No comments:
Post a Comment