प्रत्येकाच्या नशिबात
एक बायको असते,
एक बायको असते,
आपणास कळतही नसते,
डोक्यावर ती केव्हा बसते ।
बायको इतरांशी बोलताना
गोड, मृदू स्वरात बोलते,
अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही
नवऱ्याने काय पाप केले आहे ।
ज्ञानेश्वराने भिंत चालवली
बायको त्याच कौतुक करते,
नवरा अख्ख घर चालवतो
तेव्हा मात्र बायको गप्प असते ।
वस्तू कुठे ठेवली हे
बायको विसरते,
दिवसभर नवऱ्यावर
उगीचच डाफरते ।
लग्नात पाचवारी बायकोला
खूप होत होती मोठी,
आता नऊवारी गोल नेसताना
बायकोला होतेय खूपच छोटी ।
बायकोच्या प्रेमाची गड्यांनो
तऱ्हाच खूप न्यारी असते,
पाहिजे तेव्हा रेशन लागते
नको तेव्हा उतू जाते ।
वयाच्या साठीनंतर
एक मात्र बरं असतं,
बायको ओरडली तरी
नवऱ्याला ऐकू येत नसतं ।
काट्याकुट्याच्या रस्त्यातून
नवरा किती मस्तीत चालतो,
याला कारण खरं बायकोचा
मस्त, धुंद सहवास असतो ।
बायको गावाला गेली कि
देवाशपथ, करमत नसतं,
क्षणाक्षणाला रुसणारं
घरात कुणीच नसतं ।
नवरा-बायकोचं
वेगळंच नातं असतं,
एकमेकांचं चुकलं तरी
एकमेकांच्याच मिठीत जातं ।
बायकोवर रागावलो तरी
तिचं नेहमी काम पडतं,
थोडावेळ जवळ नसली तर
आपलं सर्वच काही अडत असतं ।
अव्यवस्थित संसाराला
व्यवस्थित वळण लागते,
त्यासाठी मधूनमधून
बायकोचे ऐकावंच लागते ।
सूना-नातवंडासह आता
घर चांगले सजले आहे,
बायको एकटी सापडत नाही
दु:ख मात्र एवढंच आहे ।
बायकोशी भांडताना
मन कलुषित नसावं,
दोघांचं भांडण
खेळातलंच असावं ।
नाती असतात पुष्कळ
पण नसतो कुणी कुणाचा,
खरं फक्त एकच नातं असतं
नवरा बायकोच ।।
बायकोशी भांडताना
मन कलुषित नसावं,
दोघांचं भांडण
खेळातलंच असावं ।
नाती असतात पुष्कळ
पण नसतो कुणी कुणाचा,
खरं फक्त एकच नातं असतं
नवरा बायकोच ।।
No comments:
Post a Comment