अवीट गोडीचे गाणे -- कशी झोकात चालली कोळ्याची पोर
हे गाणे मोलकरीण चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन यशवंत पेठकर यांनी केले असून निर्मिती गजानन शिर्के यांची आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद यशवंत पेठकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील गीते पी. सावळाराम व ग.दि. माडगूळकर यांनी लिहिली असून या गीतांना संगीत वसंत देसाई यांनी दिले आहे. पार्श्वगायन आशा भोसले, लता मंगेशकर व तलत मेहमूद यांनी केले आहे. या चित्रपटात सुलोचना, रमेश देव, सीमा देव, इंदिरा चिटणीस यांनी प्रमुख भूमिका केल्या आहे.
या चित्रपटात 'देव जरी मज कधी भेटला', 'कशी झोक्यात चालली कोळ्याची पोर', 'हसले आधी कोणी', 'दैव जाणिले कुणी', 'एक वार तरी राम दिसावा' हि गीते असून त्यापैकीच एक अवीट गोडीचे गाणे पुढे दिले आहे.
कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।
फेसाळ दर्याचं पाणी खारं
पिसाट पिऊनी तुफान वारं
उरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।। १ ।।
कशी झोकात हो...कशी झोकात हो... कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।
टाकून टाकशील किती रं जाळी
मेघाची सावली कुणाला घावली
वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली
वाटेला बांग दिली हिच्या समोर ।। २ ।।
कशी झोकात हो...कशी झोकात हो... कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।
केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली
कुणाला ठावं रं कुणावर भाळली
प्रीतिचा चोर तिचा राजाहून थोर ।। ३ ।।
कशी झोकात हो...कशी झोकात हो... कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।
No comments:
Post a Comment