सांघिक खेळामुळे 'विराट' सेनेचा विजय साकार
विराट सेनेने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात २-१ ने पराभव करून 'विराट' अशी ऐतिहासिक कामगिरी केली. ७१ वर्षात कुणाला जमले नाही ते 'विराट' सेनेने करून दाखवले. याचे मुख्य श्रेय जाते ते सांघिक कामगिरीला. या दौऱ्यात पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाचा दोनदा डाव संपवण्याची किमया करून दाखवली. बुमराह, शमी, इशांत शर्मा यांनी गोलंदाजीत सातत्य दाखवले. बुमराहने ४ कसोटीत ३५७ धावा देऊन २१ फलंदाज तंबूत धाडले तर शमीने ४१९ धावात १६ फलंदाज बाद केले.
फलंदाजीत सुद्धा चेतेश्वर पुजाराने कमालीचे सातत्य दाखवले. खेळपट्टीवर कसे टिकून राहावे याचा त्याने नवीन फलंदाजांना चांगलाच धडा दिला. त्याने या सिरीज मध्ये ३ शतक व १ अर्धशतक करून ५२१ धावा करून उल्लेखनीय अशी कामगीरी केली. त्याला इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली. ऋषभ पंत, अजिंक्य राहणे, जडेजा, विराट कोहली यांनी चांगली साथ दिली. विराट कोहलीने पर्थवर शतक झळकावले तर ऋषभ पंतने सिडनी कसोटीत शतकी खेळी केली. मयांक अगरवालने तर आपल्या खेळीने चांगलीच छाप पडली. त्याने फलंदाजीत दाखवलेली एकाग्रता व संयम वाखाणण्याजोगा होता. सलामीला येऊन डावाची पायाभरणी कशी करावी हे अगरवालने दाखवून दिले. त्याच्या खेळीने एका सलामीच्या फलंदाजाचा उदय झाला.
हा विजय भारतीय खेळाडूंना नक्कीच सुखावणारा आहे. आता विश्वचषक तोंडावर येऊन ठेपलेला आहे. या विजयामुळे भारतीय खेळाडूंना आत्मविश्वास आलेला असेल. या आत्मविश्वासाच्या जोरावरच भारतीय खेळाडूंना विश्वचषक जिंकणे अवघड जाणार नाही.
No comments:
Post a Comment