अभिमान
हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता सुशीला कामत व पवन कुमार जैन असून हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. मोहमद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गायली आहेत. अमिताभ बच्चन, जया भादुरी, असरानी, बिंदू यांच्या मुख्य भुमिका आहेत.
हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या उत्कृष्ठ चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या चित्रपटात जया बच्चन यांचा एकमेव आवाज लता मंगेशकर होता, तर अमिताभ बच्चन यांना तीन गायकांनी आवाज दिला होता.
मनहर उधासने "लुटे कोई मन का नगर" या गाण्यासाठी साठी डेमो रेकॉर्ड केला आणि तो मुकेशने गायला होता ; तथापि मुकेशने नकार दिला कारण त्याला वाटले की डेमो चांगला आहे आणि उधासला संधी दिली पाहिजे. हे गाणे मनहर उदास व लता मंगेशकर यांच्या आवाजात गायले गेले व अजरामर झाले. मुकेशमुळेच मनहर उदासला चांगले गीत गायला संधी मिळाली व या संधीचे मनहर उदासने सोने केले.
समीक्षकांच्या म्हणण्यानुसार सितारवादक रवी शंकर व अन्नपूर्णा देवी यांच्या वैवाहिक जीवनातील तणावावर हा चित्रपट आधारित आहे तर काहींच्या म्हणण्यानुसार गायक किशोर कुमार व त्यांची पहिली पत्नी रुमा घोष यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट भारताबरोबर श्रीलंकेमध्येसुद्धा सुपरहिट झाला तसेच कोलंबोमधील एम्पायर चित्रपटगृहात सलग ५९० दिवस दाखवला गेला.
कथानक -- सुबीर कुमार (अमिताभ बच्चन) हा एक व्यावसायिक गायक आहे ज्याची कारकीर्द प्रतिभावंत असून वाढत आहे. तो लग्न करण्याचा विचार करत नाही - जोपर्यंत तो उमाला भेटत नाही, उमा(जया भादुरी) एक गोड खेडेगावची मुलगी जी संगीताने प्रतिभावान आहे. सुबीर उमाच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो आपल्या नववधूला घेऊन मुंबईला परततो. सुबीर एक गायक म्हणून आपली कारकीर्द चालू ठेवतो आणि उमाच्या गाण्याच्या कारकिर्दीला चालना देतो. तथापि, उमाची गायन कारकीर्द जोमाने भरभराटीस येऊ लागते व सुबीरची कारकीर्द गडगडते.
अखेरीस, उमा तिच्या पतीपेक्षा अधिक यशस्वी होते. सुबीरकडून ईर्ष्या निर्माण होते. त्याचा अभिमान आणि मत्सर हे लग्न मोडून काढण्यास कारणीभूत ठरतात. सुबीरचा अहंकार वाढतो व तिचा द्वेष करू लागतो यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव उत्पन्न होतो. यानंतर दोघे वेगळे होतात. सुबीर आपल्या ईर्षेवर मात करू शकेल का हा प्रश्न पडतो. जेव्हा जोडपे वेगळे होतात आणि उमाचा गर्भपात होतो तेव्हा चित्रपट अतिशय संवेदनशील परिस्थितीत पोहोचतो. त्याच्या काकूंकडून जोरदार टीका झाल्यानंतर, ते पुन्हा भावनिक पुनर्मिलनमध्ये एकत्र येतात आणि ते एकत्र गातात.
अमिताभ बच्चन व जया भादुरी यांनी उत्कृष्ठ काम केले. आपली जोडीदार आपल्या बरोबरीच्या कलाक्षेत्रात आपल्याला मागे टाकून पुढे जाते, प्रसिद्धी मिळवते तेव्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन आपल्याच जोडीदाराचा आपण तिरस्कार करू लागतो हे अमिताभने आपल्या अभिनयातून उत्कृष्ठपणे सादर केले आहे. जया भादुरीनेही अमिताभला उत्तम साथ दिली. दोघांच्या उत्कृष्ठ कलाकारीने हा चित्रपट सुंदर झाला व परत परत बघावासा वाटतो. सुंदर अभिनयामुळे जया भादुरीने फिलेफेअरचा 'बेस्ट एक्टरेस' (उत्कृष्ठ नायिका) हा किताब मिळवला.
"लुटे कोई मन का नगर" सुपरहिट गाणे
No comments:
Post a Comment