पांडुरंगाच्या भूपाळ्या
१) उठा पांडुरंगा आता प्रभातसमयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला ।। १ ।।
गरुडपारा पासुनी महाद्वारापर्यंत ।
शुकसनकादिक नारद-तुंबर भक्तांच्या कोटी ।
त्रिशूल डमरू घेऊनि उभा गिरिजेचा पती ।। २ ।।
कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी ।
पाठीमागे उभी डोळा लावुनिया जनी ।। ३ ।।
२) उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ।। १ ।।
संत साधू मुनी अवघे झालती गोळा ।
सोडा शेज सुखे आता बघू द्या मुखकमळा ।। २ ।।
रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी ।
मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ।। ३ ।।
राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।
शेजे हालवुनी जागे करा देवराया ।। ४ ।।
गरुड हनुमंत उभे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ।। ५ ।।
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकडा ।। ६ ।।
३)
उठा उठा साधुसंत साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत ।। धृ ।।
उठोनि वेगेशी चला जाऊ राऊळांशी । जळती पातकांच्या राशी कांकड आरती देखलीया ।। १ ।।
उठोनि पहाटे विठ्ठल पहा
उभा विटे । चरण तयाचें गोमटें अमृतदृष्टी अवलोका ।। २ ।।
जागे करा रुक्मिणीवरा देव जागा कि निदुसरा । वेगें निंबलोण करा दृष्ट होईल तयासी ।। ३ ।।
पुढे वाजंत्री वाजती ढोल ढमामे गर्जती । होते कांकड आरती पांडुरंगरायाची ।। ४ ।।
सिंहनाद शंखभेरी गजर होतो महाद्वारी । केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ।। ५ ।।
४)
भक्ती चिये पोटी बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ।। १ ।।
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारकानाथा । दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा ।। धृ । माया अविद्या पीळ घालुनी कांकडा केला । अनुसंधान स्नेहामाजी सगळा भिजवीला ।। २ ।।
काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती । कोटी ब्रह्महत्या काळ मुख पाहतां जाती ।। ३ ।।
विटेसहित पाऊले जीवेभावे ओवाळू । कोटी रविशशी जैसे उगवले भानू ।। ४ ।।
एकीकडे राही एकीकडे रखुमाबाई । मयूर पिच्छ चामरे ढाळिती ठाईंच्या ठायी ।। ५ ।।
तुका म्हणे दीप घेऊनि जन्मनीत शोभा विटेवरी उभा जैसा लावण्य गाभा
।। ६ ।।
महाद्वारापासूनि गरुड परापर्यंत । झाली सुखाची दाटी नामदेव
जोडुनिया हात ।। ७ ।।
असो नसो भाव, आलो तुझिया पाया । कृपादृष्टी
पाहे मजकडे पंढरिराया ।। ८ ।।
अखंडित बैसावें ऐसे वाटते पायी ।
साहोनि संकोच ठाव थोडासा देई ।। ९ ।।
तुका म्हणे आम्ही तुझी
वेडी-वाकुडी । नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ।। १० ।।
५) पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली । ओवाळिती तुला रे देवा संत मंडळी । भक्त मंडळी ।।
५) पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली । ओवाळिती तुला रे देवा संत मंडळी । भक्त मंडळी ।।
पुंडलिकाच्या साठी देवा येथे आलासी । विटेवरी नीट उभा हात कटेशी ।
महाद्वारी गरुड उभा तुझ्या सेवेशी ।। ओवाळिती तुला रे देवा ।। १ ।।
दामाजीच्या साठी देवा महार झालाशी । कान्होपात्रा कलावंतीण नेली पायाशी ।
मीराबाईसाठी देवा विष प्रशिशी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। २ ।।
नाम्यासंगे एका ताटी तूच जेविशी । एकनाथगृही देवा पाणी वाहीशी ।
जनाबाई सुळी देता तिजशी रक्षिसी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। ३ ।।
चोख्यामेळ्यासंगे देवा ढोरे ओढीशी । गोऱ्याकुंभाराची देवा मडकी घडविशी ।
प्रल्हादाच्या भक्तीसाठी देवा स्तंभी प्रगटशी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। ४ ।।
इतुके भक्त जमुनी तुझी दृष्ट काढिती
। प्रपंचाचा वीट येऊनि आले पायाशी ।
रुक्मिणीही विनविते तुझ्यारे चरणाशी । ओवाळिती तुला रे देवा संतमंडळी ।। ५ ।।
No comments:
Post a Comment