Saturday, November 26, 2022

अवीट गोडीचे गाणे - दृष्ट लागण्याजोगे सारे 

 


अवीट गोडीचे गाणे - दृष्ट लागण्याजोगे सारे 

          'दृष्ट लागण्याजोगे सारे' हे गीत माझं घर माझा संसार या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट राजदत्त यांनी दिग्दर्शित केला. दृष्ट लागण्याजोगे सारे हे गीत सुधीर मोघे यांनी लिहिले असून या गीताला अरुण पौडवाल यांनी संगीत दिले आहे. हे गीत अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकर यांनी गायलेले आहे. हे गीत अजिंक्य देव व मुग्धा चिटणीस यांच्यावर चित्रित झालेले आहे. 'दृष्ट लागण्या जोगे सारे' हे गाणं आजही संगीत प्रेमींचं आवडतं गाणं... हे गाणं गुणगुणायला लागलं की, डोळ्या समोर येतात ती ट्रेनमधील ते नवं जोडपं. हे जोडपं नव्या संसाराचे स्वप्न उराशी बाळगून प्रवास करतात. हे जोडपं साकारलं आहे अजिंक्य देव व मुग्धा चिटणीस यांनी. 

             मुग्धा चिटणीस एक गुणवंत अभिनेत्री. तिने या एवढया एकाच चित्रपटात काम केले परंतु आपल्या गोड अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. ती केवळ अभिनेत्री नव्हती तर उत्कृष्ठ            कथा-कथाकथनकारही होती. तिने भारत आणि अमेरिकेत कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले. १० एप्रिल १९९६ साली तिचे कॅन्सर या गंभीर आजारामुळे निधन झाले तेव्हा तिचे वय होते अवघे ३१ वर्षाचे. तिच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी एका गोड अभिनेत्रीला मुकली. 'दृष्ट लागण्याजोगे सारे' या गीतामुळे हि गोड अभिनेत्री अजूनही आपल्यात आहे असे वाटते. ह्या गाण्याचे बोल ऐकले कि तिचा हसरा व गोड चेहरा डोळ्यासमोर येतो.

 

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

जुळलेले नाते अतुट घडे जन्मजन्मांची भेट

घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !



 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...