Sunday, February 23, 2020

अवीट गोडीचे गाणे -- किती सांगू मी सांगू कुणाला

 


अवीट गोडीचे गाणे -- किती सांगू मी सांगू कुणाला 

      'किती सांगू मी सांगू कुणाला' हे गीत सतीचं वाण या चित्रपटातील आहे. मालाईने केलेली सोरटी सोमनाथाची भक्तीची कथा म्हणजेच सतीचं वाण. हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता दत्ताराम गायकवाड तर दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी होते. या चित्रपटाची कथा आबाजीराव पवार यांनी लिहिली तर पटकथा, संवाद आण्णासाहेब देऊळगांवकर यांनी लिहिले. या चित्रपटातील गीते जगदीश खेबूडकर   यांनी लिहिली तर प्रभाकर जोग यांनी संगीत दिले. या चित्रपटातील गीते आशा भोसले, सुलोचना चव्हाण व जयवंत कुलकर्णी यांनी गायली. आशा काळे, कृष्णकांत दळवी, धुमाळ, ललिता पवार, वसंत शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
          'किती सांगू मी सांगू कुणाला' हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले असून या गीताला प्रभाकर जोग यांनी संगीत दिले आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे.  

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला

अष्टमिच्या राती ग यमुनेच्या काठी, गोकुळ अवतरले
गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला

मूर्ति अशी साजिरी ग, ओठावर बासरी, भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपालकाला

खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे

लपुन छपुन गिरिधारी, मारितो ग पिचकारी, रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारांत न्हाला


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...